पळसगांव जाट येथे उदासीनाचार्य श्री चन्द्रदेव यांची 530 वी जयंती साजरी।



पळसगांव जाट हे गांव चन्द्रपुर ते नागपुर व्हाया उमरेड या महामार्गावर सिन्देवाही तालुक्या मध्ये येतो।या गांवच्या तलावाच्या किनारी तीन एकर जमीन परिसर मध्ये उदासीनाचार्य श्री चन्द्रदेवजी यांचे मंदीर आहे.। या मंदीर मध्ये उदासीनाचार्य श्रीचंन्द्रदेवजी यांची साडे तीन फुट उंच्चीची संगमरमराची मुर्ति सन 2014 मध्ये बसविण्यात आली.मुर्ति आणि मंदीराच्या गाभा-याचे मार्बल/टाईल्सचे पुर्ण काम वाले, पुणे येथिल भरत महासाहेब आणि कुटुंब यांनी केले होते.



दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उदासीनाचार्य श्रीचंन्द्रदेवजी यांची जंयती खुप मोठ्या प्रमाणात मंदीराची  सजावट व लायटींग, भजन, पुजापाठ, अरदास,   उदासीनाचार्य श्रीचंन्द्रदेवजी यांची गांव मध्ये भ्रमन फेरी व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करुन करण्यात आली .। या कार्यक्रम मध्ये उदासीन समाजाचे देऊळगांव राजा, पलसगांव जाट, नागपुर चंन्द्रपुर,ब्रम्हपुरी, सुनहरा साजापुर (मध्यप्रदेश),पलसगांव मधील लोक आणि सिन्देवाही येथील पुष्कळसे सिंधी समाजाचे लोक यात सहभागी झाले होते। 


या प्रसंगी भरत महासाहेब पुणे आणि त्यांचे कुटुंबीयांच्या वतीने स्वर्गीय नारायणदास आणि आई दुर्गा देवी महासाहेब यांचे स्मृति प्रिर्त्यथ महाराष्ट्र राज्यातुन उदासीन समाजातुन   बारवी परिक्षा मध्ये प्रथम येणारे देवेंद्र दुर्गादास अलमस्त, पुसला, जिल्हा-अमरावती यांना रामललाची मुर्ति/सन्मानपत्र/रोख 3001/- रुपए व व्दितीय येणारी दिव्या रविंन्द्र महासाहेब, जलनगर वार्ड, चन्द्रपुर यांना रामललाची मुर्ति/सनमानपत्र/रोख 2501/- रुपये  देऊन नागपुरचे  क्ष किरण विशेषज्ञ डाॅ. रविन्द्र अंबरदास सावकार यांच्या शुभहस्ते प्रदान  करण्यात आले.या प्रसंगी डाॅ. रविन्द्र अंबरदास सावकारजी यांचे पळसगांव जाटच्या  उदासीन सेवा संस्थाचे वतीने रामलला ची मुर्ति आणि शाल श्रीफळ देऊन सन्मान  करण्यात आला.


या प्रसंगी उदासीन समाजाचे मान्यवर सर्वश्री. अनिल संगतसाहेब, अशोक संगतसाहेब, विनोद महासाहेब, भरत महासाहेब, रमेश महासाहेब, रवि महासाहेब, राजु महासाहेब, भजन दास अलमस्त, गौरव संगतसाहेब, संजय अलमस्त, प्रविण अलमस्त, रितेश अलमस्त, चेतन अलमस्त, रुपदास संगतसाहेब, गुड्ड अलमस्त, किशोर अलमस्त,  चंन्द्रप्रकाश सावकार, महेश उदासी, सुशिल अलमस्त, राहुल अलमस्त, विजय अलमस्त, मनोज उदासी, चन्दु अलमस्त,चेतन अलमस्त,  राजेश उदासी,मनोज अलमस्त,मनीष उदासी, नन्दु अलमस्त, हरि संगतसाहेब ,गुणवंत अलमस्त, दिनेश अलमस्त, विठ्ठल अलमस्त,लाल्या अलमस्त, शशांक महासाहेब, लेशराज उदासी, शुभम अलमस्त आदीची उपस्थिति होती।