ऊर्जा नगर वसाहत खड्ड्यात

 


चंद्रपूर (वि.प्रति.

चंद्रपूर जिल्ह्यातील उर्जानगर वसाहतीला वेगळ्या ओळखीची आवश्यकता नाही. आशिया खंडातील दुसऱ्या नंबरची तर भारत देशातील पहिल्या क्रमांकाची चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन याच ऊर्जानगर वसाहतीत स्थित आहे.

प्रदूषणामुळे भारतात चंद्रपूर जिल्ह्याची विशेष ओळख निर्माण झाली आहे त्यातच चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन यामुळे जिल्ह्यात शहरात मोठे प्रदूषण नेहमी चर्चेच्या विषय राहिले आहे परंतु आता ऊर्जा नगर वसाहतीतील रस्ते यामुळे ऊर्जा नगर वसाहत खड्ड्यात असे म्हणण्याची वेळ आली आहे

या वसाहतीतील रस्त्याची दरवर्षी लिपापोतीच्या नावाने करोडो रुपयाची कंत्राट  दिले जाते पुन्हा पुढल्या वर्षी त्या रस्त्याची तीच अवस्था बघायला मिळते यामध्ये कंत्राटदार अभियंते यांची मात्र चांदी होत असल्याचे बोलले जात आहे. निविदा मंजूर करण्यात येते मात्र महिन्याभरातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पहायला मिळते. वसाहतीतील  रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळेनासे झाले आहे

ऊर्जा भवन ते मुख्य अभियंता यांच्या बंगल्यापर्यत पॉवर स्टेशनचे मुख्य अभियंता,उपमुख्य अभियंता,अधिक्षक व इतर कर्मचारी या रस्ताने येणे जाणे करीत असतात.या रस्त्यावर  मोठमोठे खड्डे पडले आहे.वर्षभरापूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.डांबरीकरण करतांना अधिकारी सुस्त झोपेचे सोंग घेऊन होते. रस्त्याची डागडुजी करतांना गुणवत्ता तपासणे आवश्यक होते.मात्र अर्धे तुम्ही अर्धे आम्ही हे धोरण चालू असल्याने गुणवत्ता तपासण्याची गरज या विभागाला पडले नाही.अधिकारी  त्या कंत्राटदाराची मर्जी राखत पाठराखण करीत आहेत. करोडो रुपयाचा चुराडा कंत्राटदारांच्या माध्यमातून अधिकारी करीत आहेत. रस्त्याची डागडुजी असो किवा नूतनीकरण असो ते कंत्राट विशिष्ठ  कंत्राटदारालाच मिळत असते. त्यामुळे कंत्राटदार रस्त्याची लिपाफोती करून मोकळे होत असतात.मात्र वाहन चालवतांना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.विशेष म्हणजे या रस्त्यावर  कोणतेही जड वाहन चालत नाही तरी सुध्दा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने रस्त्याची गुणवत्ता काय असेल हे उघडपणे दिसून  येत आहे

ऊर्जानगर वसाहतीत पडलेल्या खड्ड्यांमुळे कंत्राट दराचे वय त्यांच्यासोबत मेली भगत असलेल्या अभियंत्याचे पितळ उघडे पडले आहे. या रस्त्यावरील लिपापोतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी आता वरिष्ठ स्तरावरून होणे गरजेचे आहे अशी मागणी या परिसरातील नागरिक करू लागले आहेत.... )