धाडसी व लोकहिताचे धडाधड निर्णय घेणारे मुनगंटीवार !



१९ एप्रिल ला लोकसभेची निवडणुक आहे. या निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे उमेदवार आहेत. नाम. मुनगंटीवार यांनी राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा पदभार सांभाळल्यानंतर अनेक धाडसी व महत्वपुर्ण निर्णय घेतले, त्याचा यानिमीत्ताने घेतलेला आढावा....!

हेही नक्की वाचा 

सुधीर मुनगंटीवार समाजभीमुख राजकारणातील युसैन बोल्ट

विकास कामामुळे सुधीर मुनगंटीवार यांना धनगर समाजाचा पाठींबा

पंतप्रधान मोदीची सभा जानकरांसाठी मास्टर स्ट्रोक ठरणार


महाराष्ट्र राज्य हे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वारसाने समृद्ध आहे. हा समृद्ध वारसा जपणे, तो अधिकाधिक वृद्धिंगत करणे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचा मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील जनतेला अभिमान वाटावा, असेच काम या वर्षभरात झाले आणि यापुढेही होत राहील. याशिवाय वन विभागाची जबाबदारी सांभाळतांना हरित महाराष्ट्राचे स्वप्न घेऊन वाटचाल सुरूआहे. मच्छीमारांना सुरक्षा देणे, त्यांना आर्थिक आधार देणे हे काम मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून होत आहे.


राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा आणि सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध होऊन काम करण्यास वर्षभरापूर्वी सुरूवात झाली. वने, सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय विभागाची जबाबदारी पार पाडतांना या क्षेत्रात नवीन काही करण्याचा प्रयत्न या वर्षभरात झाला. सांस्कृतिक कार्ये, वन आणि मत्स्यव्यवसाय विभागातील विविध कामांना उपक्रमांना गती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित आणि बलशाली होत आहे. ९ वर्षाच्या काळात विविध क्षेत्रात एक महासत्ता म्हणून पुढे आला आहे. आपले राज्य हे या विकासात आघाडीवर असावे, यासाठी सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून या तिन्ही विभागांच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा वर्ष सोहळा आपण साजरा केला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात आले. दुर्गराज रायगडावर साजरा करण्यात आलेला दैदीप्यमान असा राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम त्यासाठी १,००८ ठिकाणच्या पवित्र ठिकाणांहून आणलेल्या जलाने एकत्र केलेले जलकलश ची संकल्पना वैशिष्टयपुर्ण ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे औचित्य साधुन शिवकालिन सुवर्ण होण या नाण्याचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. गेट वे ऑफ इंडिया च्या गाभाऱ्यात सांस्कृतिक विभागाच्या पुरातत्व व वस्तु संग्रहालय संचालनालयातर्फे ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एक बोधचिन्ह राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त तयार केले. या बोधचिन्हातून राज्याभिषेकाचे महत्व समजण्यास मोठी मदत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची नवीन पिढीला ओळख करून देण्यासाठी गडकिल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके यांचे संवर्धन करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजनेत यासाठी ३ टक्के निधीची तरतूद केली आहे. किल्ले रायगड विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले.


सुधीरभाऊंनी केलेले सांस्कृतिक कार्ये !

  1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनापासुन म्हणजे १९ फेब्रुवारी २०२३ पासुन राज्यगीत म्हणुन 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत आपण स्विकारले. सांस्कृतिक विभागाने हे राज्यगीत तयार करण्यासाठी पुढाकार घेतला व महत्वाची भुमिका पार पाडली.
  2. भारतीय स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्षाच्या निमीत्ताने आजादी का अमृत महोत्सवांतर्गत १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत विशेष समारंभ, उपक्रम, योजना व विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. या प्रयोजनाकरिता तयार करण्यात आलेल्या संकेत स्थळावर १ लाख ७५ हजारांहुन अधिक कार्यक्रमांची व उपक्रमांची नोंदणी करण्यात आली आहे.
  3. पुणे येथील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद.
  4. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे दृकश्राव्य माध्यम सुविधेसह शिवचरित्रावरील उद्याने निर्मित करण्यात येणार असुन यासाठी २५० कोटी रूपयांची तरतुद.
  5. शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय तयार करण्यात येणार असुन शिवकालिन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रूपयांची तरतुद.
  6. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनास ७५ वर्ष पुर्ण णाल्याचे निमीत्ताने १७ सप्टेंबर २०२२ पासुन १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष म्हणुन साजरे करीत आहोत.
  7. सांगली येथे नविन नाट्यगृहाच्या बांधकामासाठी २५ कोटी रूपये, तर राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या देखभाल दुरूस्तीसाठी निधीची तरतुद.
  8. दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि कोल्हापूर चित्रनगरी मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ११५ कोटी रूपये निधी प्रस्तावित.
  9. नाट्ययनिर्मिती संस्थांना नवीन नाट्यनिर्मितीसाठी अनुदान योजनेस मान्यता देण्यात आली आहे. अनुदान योजनेंतर्गत नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना.
  10. सांस्कृतिक कार्य विभागात १०० टक्के ई-ऑफिसचा वापर सुरू करण्यात आला आहे. यामुळे आता सर्व प्रत्यक्ष स्वरूपातील फाईल्स आणि टपाल बंद करण्यात आले असून, आता ते केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच हाताळले जात आहे.
  11. ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि पद्मभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आपण महाराष्ट्र भूषण देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
  12. सांस्कृतिक कार्ये विभागामार्फत 'ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार' सुरू करण्यात आले. ह.भ.प. बद्रीनाथ तनपुरे महाराज, स्वामी श्री गोविंददेव गिरी, बाभूळगावकर शास्त्री महंत यांना हा पुरस्कार प्रदानक करण्यात आला.

'चला जाणू या नदीला' अभियान !

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ करण्यात आला. या नदी यात्रेचा कालावधी २ ऑक्टोबर २०२२ ते १५ ऑगस्ट २०२३ असा असणार असून यामध्ये राज्यातील सुमारे ७५ हुन अधिक नद्यांमधून यात्रा संपन्न होणार आहे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी 'चला जाणू या नदीला' हे अभियान सुरूकेले. त्याला अतिशय सकारात्मक आणि उत्साहवर्धक असा प्रतिसाद मिळाला.

(साभार)