"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा"शुभारंभ होणार




महीला सक्षमीकरणासाठी त्यांच्या हाताला काम मिळावे आणि उद्योग उभारण्यासाठी निधीची गरज असल्याने राष्ट्रनायक राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.कॅबीनेट मंत्री मा.आमदार महादेव जानकर यांनी २०२० पासून सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत होते.त्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला स्टार्टअप योजना कार्यान्वित केली आहे.या योजनेचा शुभारंभ वर्धा येथे दि.२ सप्टेंबर २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युवा व्यवसाय समृद्धी योजनेची मागणी माननीय महादेव जानकर २०२० पासून देशाचे माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री यांच्यासमोर विविध व्यासपीठाच्या माध्यमातून व पत्रव्यवहारातून सातत्याने आवाज उठवला होता. या योजनेसाठी २००० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.



या योजनेंतर्गत, महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील नवउद्यमी स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मदत दिली जाईल, 25 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. योजनेतील एकूण तरतुदीच्या 25 टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरीता राखीव ठेवण्यात येईल. या योजनेमुळे महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना स्वावलंबी होऊन स्वतंत्र पणे कार्य करता येईल.