चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये कंत्राटी कामगार अरुण सातघरे हे रात्र पाळीत काम करीत होते. थर्मल पॉवर स्टेशन मधील कोळसा वाहतूक करणारे रेल्वे ज्या ठिकाणी पलटवले जाते (टिल्पर)त्या ठिकाणी सातघरे यांचे मृतदेह आढळून आले.पहाटेच्या दरम्यान ही घटना घडल्याचे कामगारांकडून सांगण्यात येत आहे.
सातघरे यांचे मृतदेह रेल्वे रुळावर धड वेगळे असून दोन्ही हात छातीवर ठेवले आहे. रेल्वे वाघीनचे होस पाईप लावत असतांना रेल्वे समोर घेतले असावे असा कयास कामगारांनी लावला आहे.अरूण सातघरे हे शक्ती इंटरप्राइसेस मध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते.ते दुर्गापूर कोंडीत येथे वास्तव्यास होते.घटनेचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस स्टेशन करीत आहे.