चंद्रपूर (का.प्र.)
धनगर समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महायुतीचे सरकारने धनगर समाजाला १००० कोटी रुपये निधी मंजूर केला, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत राहण्याची सोय केली, धनगर समाजातील गावात मोठ्या स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधण्यात आले. यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली. घरकुल योजना मंजूर करण्यात आल्यात, यांची समस्त धनगर समाज बांधवांना माहिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे अभ्यासु, संघर्षशिल व धडाडीचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमी धनगर समाजाच्या मागण्यांवर विधानसभेमध्ये आपला आवाज बुलंद केला व त्या मागण्या मंजुर होईस्तोवर त्यांचा पाठपुरावा केला. महाराष्ट्र राज्य विधानसभेची तीचं बुलंद तोफ आज लोकसभा निवडणूक लढवित आहे.
धनगर समाजाच्या मागण्या राष्ट्रीय स्तरावर मंजूर करण्यासाठी, धनगर समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी धनगर समाजातील अनेक संघटनांनी एकत्र येऊन सुधिर मुनगंटीवार यांना पाठींबा दिला आहे.
हेही नक्की वाचा
एकाचे "सतरा" झाले तुम्ही साथ दिली तर सत्तर करू
पंतप्रधान मोदींची सभा जानकरांसाठी मास्टर स्ट्रोक ठरणार
राज्यातील धनगर समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महायुतीचे सरकारने विविध योजना अंमलात आणली असून त्याला राज्यातील धनगर समाज महायुतीच्या पाठीशी एकवटले आहेत.आदीवासी समाजाच्या धर्तीवर पहीली ते आठवीपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये राहण्यासून तर संपूर्ण शिक्षण मोफत देण्यात येत आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून जुनासुर्ला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक सभागृह बांधण्यात आले आहे.तर बेंबाळ,भंगाराम तळोधी येथे कोट्यवधी रुपये निधी सभागृहासाठी म़ंजूर केले आहे.त्यामुळे संपूर्ण धनगर समाज सुधिर मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला आहे.
नुकताच धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ विकास महात्मे यांनी चंद्रपूर येथे सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला. *धनगर समाज बांधवांनी खोटा प्रचार - अमिषाला बळी न पडता मुनगंटीवार यांना मतदान करावे, असे आवाहन धनगर बहुल भागात प्रचारादरम्यान संघटनेचे विभागीय अध्यक्ष डॉ तुषार मर्लावार, जिल्हाध्यक्ष संदीप शेरकी, संजय कन्नावार,वणी तालुक्याचे गुरूदेव चिडे,चाहणकर वरोरा चे गजानन शेळके,गोंडपिपरीचे भानेश येग्गेवार, सोमेश कंचावार यांनी केले आहे..