ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बनावट सफारी बुकिंग



ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी बुकिंगच्या नावाने गेल्या तीन ते चार वर्षांपासून ऑनलाईन बुकींग करण्याच्या नावाने फसवणूक होत असल्याची बाब समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी एक आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी बनावट ऑनलाईन सफारी बुकिंग करून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून ६१,४०० रुपये रोख आणि ३ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

 

सविस्तर असे की,१२ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑनलाईन सफारी बुकिंग च्या नावाने खोटे बनावटी ऑनलाईन बुकींग करून देण्यात आली होती. याबाबत साप्ताहिक चंद्रपूर क्रांती च्या प्रतिनिधीने भ्रमणध्वनीव्दारे सदर वनविभागीय  अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना याबाबत विचारणा केली केली होती.अधिकाऱ्यांनी सदर बाब वारेवर घेत कानाडोळा केला.यात सदर वनविभागाचे अधिकारी सामील होते हे स्पष्ट झाले होते. याबाबत मोहोर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ते आमच्या कडे येत नाही ऑनलाईन बुकींग हे विभागीय वनाधिकारी यांच्याकडे येते माझ्या कडे येत नाही असे सांगितले होते.मात्र बनावट ऑनलाईन सफारी बुकिंग थांबता थांबेना!



वनविभाग व आरटीओ कार्यालया या प्रकरणी रंगलेले?

ताडोबा आँनलाईन  घोटाळा प्रकरण खाजगी असतांना घोटाळा झाला आता वनविभाग स्वतः ही सर्व पद्धत राबवित आहे, आरोपी असलेले  केयूज कडूकर यांचे वडील आरटीओ विभागातून निवृत्त आहेत, त्यांचा मुलगा या प्रकरणात आरोपी आहे याचा अर्थ वनविभागाचे काही मोठे अधिकारी व प्रादेशिक परिवहन विभाग (rto) यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे काय? याचा तपास होणे गरजेचे आहे.


सविस्तर असे की,मनिष बावसकर यांनी आपल्या कुटुंबीयांसह ताडोबा सफारीला जाण्यासाठी केयुज कडुकर या एजंटकडून ऑनलाईन तिकीट बुक केले. त्यांनी ३८,९०० रुपये फोन पेद्वारे कडुकर यांना दिले. परंतु, सफारीच्या दिवशी त्यांना वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सांगितले की, त्यांचे तिकीट बनावट आहे. या प्रकरणी बावसकर यांनी दुर्गापुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना कडुकर याने राकेशकुमार वाजपेयी यांचेही २२,५०० रुपये घेऊन फसवणुक केल्याचे आढळून आले.


मनिष प्रभाकर बावसकर, वय ५४ वर्षे, व्यवसाय नोकरी (वित्त विभाग) रा.२७ श्रीनिकेतन कॉलणी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांनी पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे हजर येवुन रिपोर्ट दिली की, फिर्यादी यांनी त्यांचे परिवार व नातेवाईकसह ताडोबा ( Tadoba ) सफारी चंद्रपुर येथे फिरण्याकरीता आरोपी एजेन्ट केयुज कटुकर रा. चंद्रपुर मोबाईल नंबर ९५१८९३९८७९ वरून फोनद्वारे १८ लोकांचे ऑनलाईन तिकीट बुकींग केली त्याप्रमाणे आरोपीने सांगितल्याप्रमाणे फिर्यादीनी दिनांक २५/०३/२०२३ रोजी सफारी बुकींगच्या नावाखाली २५,५००/-रू. दिनांक २७/०३/२०२३ रोजी ३०००/-रू. व दिनांक १४/०४/२०२३ रोजी १०,४००/-रू. असे एकुण ३८,९००/-रु. फोन पे द्वारे पे पाठवुन माहे जुन/२०२३ रोजी ची ताडोबा सफारी बुकींग कम्फर्म केली, परंतु अपरीहार्य कारणाने ते सफारी बुकींग करीता येवु शकले नाही. सदर रक्कम केयुज कडुकर यांचेकडे जमा होती. परत त्यांनी आरोपीस ताडोबा सफारी बुकींग करीता दिनांक १८/११/२०२३ रोजी गुगल पे द्वारे ५०००/-रु. सेन्ड करून दिनांक २७/०१/२०२४ रोजी ची ताडोबा सफारी बुकींग कम्फर्म केली.

 

दिनांक २७/०१/२०२४ रोजी फिर्यादी व त्याचे नातेवाईक ताडोबा सफारी करीता मोहुर्ली गेट येथे गेले त्यांनी बुकींग केलेली तिकीट दाखविली असता सदर तिकीट बनावट असल्याचे वनविभाग कर्मचारी यांनी फिर्यादी यांना सांगितले. तसेच आरोपी केयुज कडुकर यांने राकेशकुमार मोतीलाल वाजपेयी वय ५८ वर्षे रा.उदयगिरी अनुशक्ती नगर मुंबई यांचे दिनांक ०६/०१/२०२४ रोजी ताडोबा सफारी करीता ०४ ऑनलाईन तिकीट बुक करून त्यांचेकडून सुध्दा गुगल पे द्वारे २२,५००/-रु. घेवुन फिर्यादी व राकेशकुमार वाजपेयी या दोघांची मिळून एकूण ६६,४००/-रु. ची ताडोबा सफारी बुकींगच्या नावाखाली फसवणुक केल्याने पो.स्टे. दुर्गापुर ला अपराध क्रमांक २६/२०२४ कलम ४२० भादवि सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.