शहीद भगतसिंग चौकाचे अपमान होत असल्याने करणार अनोखा आंदोलन.... प्रशांत भारती



चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शहीद भगतसिंग चौक एसटी वर्कशॉप  येथे मागील काही वर्षा पूर्वी मनपाद्वारे सौंदर्गीकरण करण्यात आले होते. पण मनपा अभियंता व प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी कुठलाही विचार न करता आपली बुद्धी वेशीवर टांगून देशाचे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला मागे ठेवून त्यांच्या चेहऱ्या पुढे तीन घोडे उभारण्यात आले व त्या महान क्रांतिकारक नेत्याचा अपमान करण्यात आला. त्यामुळे आम्हाला घोड्यापेक्षा देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाचे हिरो भगतसिंग महत्त्वाचे आहे. तरी आम्ही हा अपमान सहन करणार नाही लवकरात लवकर हे सुंदरीकरण तोडून त्या ठिकाणी शहीद भगतसिंग यांचा मोठा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा. याकरिता आज महानगरपालिकेचे आयुक्ताकडे निवेदना स्वरूपात मागणी करण्यात आली.


मनपाकडून कारवाई न झाल्यास ज्या पद्धतीने मनपा प्रशासनाने घोड्याचा मागील पृष्ठ भाग शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेकडे ठेवण्याचा नालायक प्रकार मनपा प्रशासनाने केलेला आहे. त्या संदर्भात ऊचित कार्यवाही न झाल्यास पृष्ठभाग दिखाव आंदोलन मनपा आयुक्तांपुढे करण्यात येईल याची नोंद मनपा प्रशासनाने घ्यावी.अन्यथा मनपाच्या विरोधात  अनोखा आंदोलन करण्याचे काॅग्रेसचे प्रशांत भारती यांनी केली आहे.