चंद्रपूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय सध्या चांगलेच सिगेला पोहोचले आहेत.नुकताच चंद्रपूर जिल्ह्यात मुखिया असणाऱ्या तम्बाकू तस्कारांना पोलीसांनी मुसक्या आवळल्या होत्या,मात्र जिल्हयातील नागभिड तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणात खुलेआम तस्करी होतांना दिसत आहे.यात नागभिड मधील लक्की ला अन्न व औषध विभागाच्या आशीवार्दाने खुलेआम भेसड तेल व सुगंधित तम्बाकू ची विक्री करण्याची जणू मुभाच देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हयातील नागभीड मध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ तेलाची विक्री सुरू आहे. यासाठी भेसळ तेल तयार करण्यासाठी नागभिड शहराबाहेर राज्य महामार्गावर या लक्कीचे मोठे गोदाम आहे.याच गोदामांमध्ये भेसळ तेल व सुगंधित तंबाखू ची साठवणूक केली जाते.लक्की यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वताचे राजकीय हितसंबंध मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत निकटचे संबंध असल्याचे दाखवित अधिकाऱ्यांना बिदागी देत रवाना केले जाते.त्यामुळे लक्कीने निष्पाप निरागस जिवांना रोगी बनविण्याचे कंत्राट घेतल्याचे दिसत आहे
लक्कि च्या भेसळ तेलाच्या विक्रीमुळे सर्व सामान्य जनतेवर परीणाम पडत आहे.भेसळ तेलामुळे लहान बालके,गरोदर महीला, जेष्ठ नागरिक यांच्यावर खुप मोठे परीणाम होत असल्याचे दिसून आले आहे.या भेसळ तेलामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहे.भेसळ माल विकणाऱ्या या लक्कीवर कार्यवाही होणार का याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. सविस्तर वाचा पुढील बातमी सूगंधीत तंबाखू ची तस्करी....