खेडी गोंडपिपरी मार्ग कंत्राटदारांच्या घश्यात कामगार सेनेचा आरोप shivsena

 


 चंद्रपूर जिल्ह्यातील खेडी गोंडपिपरी पोडसा या राज्यमार्गाच्या नुतनीकरण करण्याचे काम सुरू आहे.सन २०१९ मध्ये तात्कालीन फडणविस सरकारने या रोडच्या नुतणीकरणासाठी २१८ कोटी रुपये मंजूर केले.या कामाचे कंत्राट तात्कालीन व विद्यमान क्रांती भुमिचे आमदार यांच्या कंपणीला मिळाले.मात्र हा मार्ग बनत नसल्याने संपूर्ण मार्गाचा निधि कंत्राटदारांनी गिळंकृत केले की काय असा आरोप दि.९ ऑगष्ट रोजी आयोजित सध्दबुध्दी आंदोलनात शिवसेना भारतीय कंत्राटी कामगार सेनेचे जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांनी केली. 

  



  खेडी गोंडपिपरी  रोड अंदाजे 40 कि मी.आहे. हा रोड पुर्णतः फुटलेला होता.त्यामुळे या रोडचे नुतनीकरण करायचे होते.कंत्राटदारांनी स्वहीत जोपासत या रोडचे तिनं तेरा वाजवले आहे.यासाठी अनेकदा निवेदने आंदोलने करण्यात आली.मात्र अजूनही रस्ता पुर्णत्वास आले नाही.सार्वजनिक बांधकाम विभाग या कंत्राटदाराला पाठीशी घालत अनेक मुदत वाढ करुन दिले आहे.या कंपणीवर अनेकदा दंड ही ठोठावण्यात आले आहे.तरीसुध्दा कंपणीने रोड बनविले नाही.या रोडवर अनेक अपघात झाले.यात ८- १० जणांचा बळी गेला त्यामुळे या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदाराला पाठीशी घातल्यास आणखी तिव्र लढा उभारण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.९ ऑगस्ट २०२३ जुनासुर्ला येथील खड्ड्यात माती टाकून कंत्राटदाराला काम पुर्ण करण्याचे बळ मिळो यासाठी सध्दबुध्दी आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शिवसेना कंत्राटी कामगार सेना जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांच्या नेतृत्वात शंकर पाटेवार,रवि शेळके, संदीप गिरडकर, मार्शल अडकिणे ,अक्षय मेश्राम,सुरज गोरंकल व कार्यकर्ते उपस्थित होते. 





तृतीयपंथीय हक्क कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावरील ताली । Taali Web Series on JioCinema

तृतीयपंथीय हक्क कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावरील ताली । Taali Web Series on JioCinema

तृतीयपंथीय हक्क कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावरील ताली । Taali Web Series on JioCinema (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); ताली...
चंद्रपूरच्या 'या' महिलेवर साकारला हृदयस्पर्शी चित्रपट Inspiring Film "Tai" Release

चंद्रपूरच्या 'या' महिलेवर साकारला हृदयस्पर्शी चित्रपट Inspiring Film "Tai" Release

जेमिनी कुकिंग ऑइल कंपनीने बांबू लेडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या चंद्रपूर येथील मीनाक्षी मुकेश वाळके यांच्या उल्लेखनीय जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारा चित्रपट तयार केला आहे. हृदयस्पर्शी पण उत्साहवर्धक लघुपट...