विषय तज्ञांनी केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग Minor girl molested by subject experts



सिदेंवाही पंचायत समितीतीत Sidenwahi Panchayat Samiti विषयतज्ञ म्हणून भारत मेश्राम Bharat Meshram हे कार्यरत आहे.विविध स्पर्धा परीक्षा व निबंध स्पर्धेचे आयोजन त्याने केले त्याच माध्यमातून दोन वर्षांपूर्वी एका ग्रामीण भागातील एका अल्पवयीन मुलीची ओळख झाली.ओळखीनंतर त्यांचे त्या मुलीच्या घरी येणे जाणे सुरू झाले.यावेळी त्याने त्या मुलीला शहरात भाड्याची खोली करून दिली.त्यात भाऊ व बहीण शिक्षण घेत राहू लागले. बुधवारी त्या मुलीच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून तुझ्या खोलीवर येत असल्याचे सांगितले.दुपारच्या दरम्यान खोलीवर गेला त्या एकटी असल्याचे संधी साधून तीचा विनयभंग केला.यावेळी प्रतीकार करून जाब विचारताच तिथून पळ काढला, दरम्यान तिचा भाऊ खोलीवर येताच तिने घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर गावाकडे असलेल्या आईवडिलांना याबाबत सांगितले.आई वडीलांनी सिंदेंवाही पोलीस स्टेशन Sindenwahi Police Station गाठून घडलेला प्रकार सांगितला, पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी विषयतज्ञ भारत मेश्राम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून विविध कलमान्वये व बाल लैंगिक अपराध संरक्षण कायद्या २०१२ च्या ८ अन्वये गुन्हा दाखल करून गुरुवारी पोलीसांनी अटक केली.न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या घटनेचा पुढील तपास Sub Divisional Police Officer यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक Inspector of Policeहे करीत आहेत.