वंचित घटकाला राजकिय प्रवाहात आणण्यासाठी जानकरांचे कार्य कौतुकास्पद.... अण्णा हजारे Jankar's work to bring the underprivileged into the political stream is commendable.... Anna Hazare



माजी मंत्री महादेव जानकर Former minister Mahadev Jankar हे कौंटुबिक सुखाचा त्याग करीत राष्ट्र हेच माझे कुंटुब आहे असे समजुन राज्यात व देशात वंचित घटकाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे Senior social worker Anna Hazare यांनी केले.


राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अहमदनगर दक्षिण लोकसभा Ahmadnagar South Lok Sabha on behalf of Rashtriya Samaj Partyमतदारसंघांमध्ये जन स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीगोंदा येथुन सुरू झालेली जनस्- वराज्य यात्रा पारनेर तालुक्यात बेलवंडी फाटा येथे आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते, प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, प्रदेश सरचिटणीस रवींद्र कोठारी, पश्चिम महाराष्ट्र युवकाध्यक्ष अजित पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, अहमदनगर जिल्हा रासपा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे, अहमदनगर महिला अध्यक्ष सुवर्णाताई जराड, राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरूरतालुका अध्यक्ष शिवाजीराव कु-हाडे, सरपंच लाभेश औटी, शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, देविदास पवार, विलास रोहिले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



अण्णा हजारे यावेळी म्हणाले, लोकशाही बळकट होण्यासाठी राजकीय प्रवाहाच्या बाहेर असलेल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. मात्र सध्या राज्यात व देशात ठरावीक घराण्यांनाच व त्यांच्या वारसांना प्रतिनिधित्व दिले जाते. महादेव जानकर हे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असून देशात व राज्यात वंचित घटकासाठी करीत असलेले कार्य ते लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
     

 महादेव जानकर म्हणाले की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार, लोकपाल बिल यासाठी प्राणाची बाजी लावत देशातील जनतेला एक क्रांतिकारी शस्त्र हातात दिले आहे. त्यामुळे सर्वसामान्यजनतेला न्याय मिळत आहे. थोर समाजसेवक हजारे यांनी देशाचे चित्र बदलांचे कार्य केले आहे. हजारे हे तरुणांसाठी आदर्श व प्रेरणादायी असून त्यांच्याच रूपाने या देशाला मिळालेले दुसरे महात्मा गांधी आहेत. दरम्यान लोकपाल बिल विधान परिषदेमध्ये मांडून त्याला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी अण्णा हजारे यांनी केली. त्यावेळेस याबाबत विधान परिषदेमध्ये हे बिल मांडण्याचे आश्वासन माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी दिले.