अतुल गण्यारपवार यांच्यावरील अमानुष मारहाणीचा निषेध करीत कार्यवाहीची Action was taken to protest the inhuman beating of Atul Ganyarpawar मागणी
दिनांक २०/४/२०२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार यांना चामोर्शी पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सकाळी ५ वाजता बेदम मारहाण केली, ह्यात त्यांचे एक हात तुटुन ते गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे, ह्या अमानुष मारहाणीचा घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील समस्त कोमटी समाजात संतापाची लाट पसरली असून त्यांनी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे ह्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.अहेरी तालुक्यातील अहेरी, आलापल्ली आणि नागेपल्ली येथिल आर्य वैश्य कोमटी समाजातर्फे जिल्हाधिकारी गडचिरोली यांना तहसीलदार अहेरी मार्फत आज एक निवेदन देत पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना त्वरित निलंबित करीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे, येत्या २ दिवसात कारवाई झाली नाही तर अहेरी तालुक्यातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद करण्याचा इशाराही ह्या निवेदनातुन देण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांचे सासरे हे एक विद्यमान आमदार आहे त्यामुळे खांडवे यांचे मनोबल चांगलेच वाढले आहे.सासऱ्यांच्या जोरावर प्रतीष्ठित व्यक्तींना विनाकारण मारहाण करण्याचे सत्र सुरू केले आहे.अतुल गण्यारपवार यांना केलेली मारहाण त्याच धर्तीवर झालेले असून त्यांच्या पाठीमागे निवडणूकिचे राजकारण लपले आहे.गण्यारपवार हे मागील दशकांपासून एकहाती बाजार समितीची सत्ता मिळविली आहे. विरोधकांची चांगलीच पळती भुई होत असल्याने त्यांच्यावर विरोधकाकरवी पोलीस निरीक्षक यांनी अमानुष मारहाण केल्याचे बोलले जात आहे.
निवेदन देतांना अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली सह अहेरी तालुक्यातील कोमटी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.