बोगस झाडे जातीचे घुसखोरी थांबविण्यासाठी १० ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण Indefinite hunger strike from October 10 to stop encroachment of bogus trees



गडचिरोली जिल्ह्यात भटक्या जमाती (क) प्रवर्गातील पोटजात झाडे या नामसदृष्याचा गैरफायदा घेत
झाडे कुणबी जातीतील लोक घुसखोरी करीत आहेत. गडचिरोली पोलीस भरती २०२१ मध्ये ३ बोगस झाडे उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे. परंतु वर्षभराचा कालावधी लोटुनही जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलीडीटी सर्टीफीकेट) सादर केलेले नसतांना त्यांना बडतर्फ करण्यात आलेला नाही. 


गडचिरोली पोलीस भरती २०२२ मध्ये १० बोगस झाडे उमेदवारांची निवड झालेली आहे. त्यात जात पडताळणी अवैद्य केलेल्या उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन निवड रह केलेली नाही.राज्य राखीव पोलीस बल क्र. १८ काटोल नागपूर भरती २०२१ मध्ये ५ बोगस झाडे उमेदवारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बोगस असल्याचे आक्षेप घेतल्यानंतरही त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 



वरील प्रमाणे भटक्या जमाती (क) मधील खऱ्या उमेदवारांवर अन्याय होत आहे.पोलीस प्रशासन बोगस झाडे विरोधात कुठलीच कारवाई केलेली नाही.त्यामुळे गडचिरोली पोलीस विभाग, जिल्हा जात पडताळणी समिती व राज्य राखीव पोलीस बल विभागाचे विरोधात खालील मागण्या घेऊन पोलीस भरतीतील अन्यायग्रस्त उमेदवार १० ऑक्टोबर २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत उपोषण करीत आहेत.

खालील प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहणार :-

१) गडचिरोली पोलीस भरती २०११ मध्ये नियुक्त झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील बोगस झाडे उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्या उमेदवारांना बडतर्फ करण्यात यावे.
२)गडचिरोली पोलीस भरती २०२२ मध्ये निवड झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील उमेदवार ज्यांची जात वैधता रद्द झालेली आहे. त्यांचेवर गुन्हे दाखल करुन निवड रद्द करण्यात यावी.


३)भटक्या जमाती (क) मधील बोगस झाडे उमेदवारांचे जात पडताळणी समिती गडचिरोली यांनी तात्काळ जात वैद्य / अवैध ठरवावे.
४)गडचिरोली पोलीस भरतीतील प्रतिक्षा यादीतील खन्या भटक्या जमाती (क) उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे.
५) राज्य राखीव पोलीस भरती काटोल येथील बोगस झाडे उमेदवारांना बडतर्फ करण्यात यावे.