पत्रकार दिन व सत्कार सोहळा कार्यक्रम चंद्रपूरातचंद्रपूर :- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती प्रित्यर्थ पत्रकार दिन तथा मान्यवरांचा सत्कार सोहळा कार्यक्रम ६ जानेवारी २०२३. वेळ सायं. ४.०० वाजता. स्थळ :- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, सभागृह रामाळा तलाव रोड, चंद्रपूर येथे घेण्यात येत आहे


या कार्यक्रमाचे उद्घाटक :- मा. ना. श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य,मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर हे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. शैलेश अलोणे, संस्थापक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ हे राहणार आहेत.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. रविंद्रसिंह परदेसी, (IPS) पोलीस अधिक्षक, चंद्रपूर, मा. श्री. अशोक करे, प्रादेशिक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर, मा. श्री. गजानन वाघमारे, म. राज्यअध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ. मा. श्री. राजेशभाऊ डांगटे, संस्थापक सचिव महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ. मा. श्री. पंकज सपाटे, मुख्य अभियंता चंद्रपुर सुपर थर्मल पॉवर स्टेशन, चंद्रपूर, मा. श्री. किरण मोरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर,मा. श्री. मुकेश टांगले, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, क्रं. २, चंद्रपूर, मा. श्री. राजेश येसनकर, जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर ,मा. श्री. सुनिल पाटील, अध्यक्ष संघर्ष समिती, चंद्रपूर,मा. श्री. देवनाथ गंडाटे, सदस्य, डिजीटल मिडीया ग्रिवेंन्स कॉन्सील ऑफ इंडिया नवी दिल्ली,हे राहणार आहेत, या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संजय कन्नावार संपादक सा. चंद्रपूर क्रांती,कुमार जुनमलवार संपादक सा. कुमार दर्पण,डि. एस. ख्वाजा जिला प्रतिनिधी विदर्भ प्रिन्ट,
रकीब शेख संपादक सा.कोलसिटी खबर यांनी केले आहे