चंद्रपूर:- काल रात्री १०.३० वा. सुमारास पो.स्टे. दुर्गापूर हद्दीतील ईमली बार व नायरा पेट्रोलपंप समोर दुर्गापूर रोडवर जुन्या वैमन्यस्यातून 7 ते 8 इसमानी मृतक नामे महेश मेश्राम रा. दुर्गापूर हा ईमली बार येथे मित्रा सोबत गेला असताना आरोपीनी त्याचेवर पाळत ठेवून घेराव घालून धारदार घातक शस्त्रांनी वार करून जिवानीशी ठार केले व त्याचे शिर निर्दयपणे धडावेगळे करून घटनास्थळापासून अंदाजे 50 मिटर दूर फेकून पळुन गेले. रिपोर्ट दुर्गापूर पोलीस स्टेशनला अप क्र. 189/2022 कलम 302, 143, 147, 149, 427 भा. द.वी. सह कलम 4. 25 भारतिय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सदर गुन्हयातील आरोपीताचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोउपनि अतुल कावळे यांचेसह अमलदाराची चार विशेष शोध पथके गठीत करण्यात आली. सदर पथकांनी अज्ञात आरोपीताचे नाव व त्यांचे ठावठिकाणा बाबत गोपनिय माहिती प्राप्त करून तांत्रीक तपास केला असता यातील संशयीत आरोपी इसम हे वर्धा जिल्हयात स्कॉर्पीओ गाडीने पळुन जात असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्यावरून लागलीच सदर वाहनाचा माग काढून स्थानीक गुन्हा शाखेचे सपोनि कापडे व सपोनि भोयर यांचे पथकांनी पाठलाग करून सदर स्कॉर्पीओला आरंभा टोल नाका, जिल्हा वर्धा येथे दोन वाहने आडवे लावून अडविले व योग्यती काळजी घेवून शिताफीने वाहनामधील संशयीत नामे 1) अतुल मालाजी अल्लीवार, वय 22 वर्ष रा. समता नगर वार्ड क्र 6 दुर्गापुर, 2) दिपक नरेद्र खोब्रागडे, वय 18 वर्ष रा. समता नगर वार्ड क्र 6 दुर्गापुर, 3) सिध्दार्थ आदेश बन्सोड, वय 21 वर्ष रा नेरी दुर्गापुर, (4) संदेश सुरेश चोखान्द्रे, वय 19 वर्ष रा सम्राट अशोक वार्ड क्रं 2 दुर्गापुर चंद्रपुर, 5) सुरज दिलीप शहारे वय 19 वर्ष रा. समता नगर वार्ड क्रं 6 दुर्गापुर, 6) साहेबराव उत्तम मलिये वय 45 वर्ष रा नेरी समतानगर वार्ड क्र 6 दुर्गापुर, 7) अजय नानाजी दुपारे वय 24 वर्ष रा उर्जानगर कोंडी दूर्गापुर व 8) प्रमोद रामलाल सुर्यवंशी, वय 42 वर्ष, राउजीनगर दुर्गापुर अशा एकूण 8 संशयीत आरोपीत इसमांना स्कॉर्पीओ वाहनासह गुन्हा घडल्यापासुन अवघ्या काही तासात ताब्यात घेतले.
सदर संशयीत आरोपीताना स्थानिक गुन्हे शाखेत आणुन त्याचेकडे गुन्हयासबंधाने विचारपुस केली असता सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता यातील सराईत आरोपी क्र. 1 ते 6 यांचा सदर गुन्हयात प्रत्यक्ष सहभागी असून यातील आरोपी क्र. 7 व 8 यानी आपले ताब्यातील चारचाकी स्कॉर्पीओ वाहन क्र. एम.एच. 04 जिझेड 9091 नी वरिल नमुद अरोपीतास पळुन जाण्यास मदत केली असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत असल्याने नमुद आरोपीताना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन दुर्गापूर यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री रविद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रीना जनवधू यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था. गु.शा. चे स.पो.नि. जितेंद्र बोबडे, स.पो.नि. संदीप कापडे, स.पो.नि. मंगेश भोयर, पोउपनि कावळे, पो.हवा. संजय आतंकुलवार, धनराज करकाडे, सुरेद्र महतो, नितीन साळवे, ना. पो. कॉ. सुभाष गोहोकार, संतोष येलपुलवार, जमीर पठाण, मलिंद चव्हाण, गजानन नागरे, अजय बागेसर पो. कॉ. गोपाल आतकूलवार, नितीन रायपुरे रविंद्र पंधरे, गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, मिलींद जांमुळे, प्रशांत नागोसे, गोपीनाथ नरोटे, महीला अमलदार अपन मानकर तसेच सायबर पोस्टे येथील पोहवा मुजावर अली यांनी केली आहे.