मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार राष्ट्रीय समाज पक्षाचे नवीन कार्यालयाचे उद्घाटनराष्ट्रीय समाज पक्षाचे आझाद मैदान मुंबई येथे गुरुवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , मा. ना. मंगल प्रभात लोढा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपकजी केसरकर. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर साहेब ,एस एल अक्की सागर साहेब ,आ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थित होणार आहे तरी या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी  मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे. 

असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते, महाराष्ट्र महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर व प्रदेश पदाधिकारी यांनी केली आहे.