sudhir mungantiwar समाजाभिमुख राजकारणातील युसैन बोल्ट !



सन १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्याबद्दल व्यक्तिगत आत्मीय सहानुभूती असुनसुद्धा तयांच्या विरोधात वेगळ्या विचारधारेमुळे निवडणुक लढविणारे गोरगरीबांचे डॉक्टर डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार आणि स्व. चांगुणाताई या आदर्श माता-पित्यांच्या पोटी सुधीरभाऊंचा जन्म ३० जुलै १९६२ ला झाला. त्याचवर्षी चीनने भारतावर आक्रमण केले होते म्हणुनच की काय सुधीरभाऊ शालेय-महाविद्यालयीन जीवनापासुन जनप्रश्न सोडविण्यासाठी आक्रमक आहे.


मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषातील वक्तृत्व आणि लिखाणावर त्यांची फार पकड असली, ते ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यासारखे अभ्यासू असले, विदेशवारीचा उद्देश केवळ पर्यटन हा न् ठेवता त्या-त्या देशतील काय काय आपल्या चांदा जिल्ह्यात, विदर्भात, महाराष्ट्रात आणता येईल हाच त्यांचा उदद्देश असतो. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असा शांत वाहते गंगामाई स्वभाव असला तरी अन्याय, भ्रष्टाचार विरोधात हा क्रुसेडर एखाद्या सात्विक संतापापायी जेंव्हा आक्रमक होतो तेंव्हा तो कुणाला जनदाग्नी वाटु शकाते, या बुवास खोटे बोलणे, थापा मारणे, कुणाची निंदा करणे मुळीच जमत नाही म्हणुन ते समोरच्यांकडून तशीच अपेक्षा करतात हे त्यांचे चुकले कोठे ?


सत्तापक्षात असो कि विरोधी पक्षात असो विधीमंडळात कोण काय आणि केंव्हा काय बोलले याचा मिनीट, सेकंदाचा तपशिल या मानवी परम संगणकाकडे सदैव अपटुडेट असतो. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक इत्यादींचा जनप्रश्न तातडीने सोडविण्यासाठी 'हॅलो चंद्रपूर' योजना प्रचंड जनप्रतिसाद मिळवीत आहे. चंद्रपूर सुपूत्र कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे मूल येथील बहुउपयोगी स्मारक असो कि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांचे स्मारक सांगली या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्याचे स्वप्न त्यांनी विरोधी पक्ष आमदार म्हणुन काँग्रेस-राकाँ आघाडी च्या सत्ताकाळात पाहिले आणि त्याची पूर्तता करणे शक्य झाले याचे कारण एकच कि वैचारिक मतभेद अवश्य असावे पण मनभेद मुळीच असु नये ही त्यांची आदर्श आचारविचार शैली आणि तोडीला चिकाटी, जिद्द ची साथ !


डॉक्टर न् होता समाजाभिमुख राजकारणी हा पर्याय त्यांनी निवडल्यामुळे आणि तो महाराष्ट्रासाठी आश्वासक आणि सुखावह असला तरी महाराष्ट्राने एक संभावित पत्रकार गमावलेलाआहे. भुमिपूत्र आणि व्यवसायाने शेतकरी असलेल्या सुधीरचे वडील डॉ. सच्चिदानंद, पत्नी वपना, मुलगी शलाकार असे आटोपशीर कुटूंब आहे. त्यांचे बंधू डॉक्टर आहेत. भगीनी सुस्थितीत आहे हे त्यांचे लौकीक अर्थाने कुटूंब असले तरी या बुवाने प्रत्यक्षात सर्वच समाजाला आपले कुटूंब मानून या विशाल कुटुंबाच्या भल्याची जबाबदारी समर्पित भावनेने समर्थपणे सांभाळली आहे.


हरित महाराष्ट्रासाठी वृक्ष लागवड महाअभियान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ऐतिहासिक वास्तुचे संवर्धन आणि जतन, गोंडवाना विद्यापीठ स्थापना, अत्याधुनिक इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन, जनप्रश्न सोडवणुक आणि जन मार्गदर्शनन यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची स्थापना आणि तेथे साहित्य, रंगभुमी, संस्कृती साठी व्यासपिठ, जनता आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक केंद्र बनविणे, अंधारी-ताडोबा व्याघ्र प्रकल्पास जागतिक स्तराचे पर्यटन केंद्र बनविणे, आपल्या मंत्रालयाला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळवून देतांना त्यांचे मंत्रालय त्याबाबतीत, मानांकन मिळविणारे भारतातील पहिले मंत्रालय ठरले.


'गांधी फॉर टुमारो' उद्यानासाठी गांधी या प्रकल्पांनी काँग्रेस-राकाँ च्या आघाडी सरकारात कागदोपत्रीचं अस्तित्व होते पण सुधीरभाऊंनी ही योजना -हा प्रकल्प जवळजवळ पुर्णत्वास आणुन वर्धा जिल्ह्यातील जनतेचे आणखी प्रेम प्राप्त केले आहे. गांधीजी-विनोबाजी यांच्या परीस्पर्शाने, कार्याने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यातील परिसराचा खराखुरा विकास म्हणजेचे गांधी फॉर टुमारो !


भारतरत्न पं. अअलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग, लालकृष्णजी अडवानी, स्व. प्रमोद महाजन, नितीनभाऊ गडकरी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरूण जेटली. मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस इत्यादी मान्यवरांना कर्तबगार सुधीर फार फार भावला आहे. त्यांची सामाजिक बांधीलकी ध्यानात घेता उद्योगपतींचे अग्रणी त्यांची चंद्रपूर येथे भेट घेवून सामाजिक प्रकल्प त्यांचे सहकार्याने राबविण्याचा सार्थक प्रस्ताव ठेवतात. योगगुरू आचार्य रामदेवबाबा आपले प्रकल्प विस्तारित करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि चांदा जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्तीचा सुयोग्य वापर करण्यासाठी त्यांच्यापुढे सहकार्याचा हात पुऐ करतात ही फार मोठी उपलब्धी आहे. विदेशी व्हीआयपी राजशिष्टाचार बाजुला सारून विविध विषय - प्रकल्पावर त्यांच्याशी स्वतःहुन चर्चा करता ही बाब महत्वाची आहे.


वर्धा जिल्ह्यातील लहान मोठे जनप्रतिनिधी, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला तर पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक इत्यादींचा समावेश असलेली 'वर्धा हेल्पलाईन' जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्थापित करू शकतात. चांदा हेल्पलाईन ला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रकारची भारतातील प्रथम हेल्पलाईन 'हॅलो चांदा' आहे.