बल्लारपूर रेल्वे स्टेशन हादरलेमध्य भारतातील मध्य रेल्वेचे शेवटचे जंक्शन असलेले व आदर्श रेल्वेस्थानक असा बहुमान मिळविणाऱ्या बल्लारशाह ( ballarpur)रेल्वेrailway स्थानकावर आज फार मोठी दुर्घटना घडली असून प्रवाशांना प्लाॅटफार्म १ वरुन जाणाऱ्या पादचारी पुलाचे मध्यभागी असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याने अनेक प्रवाशी रेल्वे रुळावर पडल्याने व रेल्वेच्या २५०० केव्ही विजेचा धक्का लागल्याने गभिररीत्या जखमी झाले आहे.

सदर अपघात हा इतका भयंकर होता की कोसळलेल्या काही जणांचा रेल्वेच्या 2500 केव्हीं इलेक्ट्रिक लाईनला स्पर्श झाल्याने ते प्रवासी गंभीररित्या भाजल्या गेले. उंचावरून कोसळल्याने सर्व प्रवसी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पैकी सर्व प्रवासी गंभीर असून त्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन कामाला लागले आहे.घटनेची माहीती कळताच रेल्वे स्थानकावर स्थानिक रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहे. वृत्त लिहिस्तोवर कुठलीही प्राणहानी झाल्याची माहिती मिळाली नसून जखमींचा संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. Ballarpur over bridge collapsed