जानकरसाहेब तुमचा आशीर्वाद असेल तर मी पुन्हा आमदार होईल-बाळासाहेब मुरकुटे


सावरगांव, ता-पाटोदा, जि-बीड येथील लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला जाताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब आणि आम्ही पदाधिकारी गप्पा मारत रस्त्याच्या बाजूला बसलो होतो. आमच्या गप्पा रंगल्या असताना बरीच वाहणे गर्दी पाहून थांबवायचे आणि जानकर साहेबांना पाहून जवळ यायचे साहेब उठून बाजूला जायचे त्यांच्या सोबत फोटो काढायचे त्यांना निरोप द्यायचे आणि पुन्हा आमची चर्चा सुरू असे बराच वेळ आम्ही गप्पा मारत असताना तिथे अचानक नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आले. जानकर साहेब रस्त्यावर बसलेले पाहून ते ही त्यांच्या समोरच येऊन बसत म्हणाले, मातीशी आणि जमिनीशी नात घट्ट असणारे नेतृत्व जर असे निवांत बसले असेल तर मी का बसू नये. गप्पा मारताना माजी आमदार बाळासाहेबांनी त्यांच्या तालुक्याची परिस्थिती सांगताना जानकर साहेब तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं तर मी पुन्हा आमदार होईल असे वक्तव्य केले. जानकर साहेबांनी देखील दाद देत माऊली मी नक्कीच चांगली माणसे आणि मुंडे साहेबांनी मोठी केलेल्या सर्वांना सोबत घेऊन चालायचा पर्यँत करतोय तुम्ही साथ द्या आपण मुंडे साहेबांच स्वप्न पूर्ण करू असा विश्वास दिला.