धनगर (भटक्या जमाती 'क' ) प्रवर्गातून निवड झालेल्या गैर धनगर उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करा.. संजय कन्नावार



चंद्रपूर:- गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2022 ही प्रक्रिया नुकतीच राबविण्यात आली या भरतीमध्ये भटक्या जमाती प्रवर्गाकरीता पुरुष 5 व महिला 2 असे एकुण 7 जागा आरक्षित होत्या. सदर भरतीची निवड यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे या यादीमध्ये पुरुष 2 ,महीला १ यांची निवड भटक्या जमाती क प्रवर्गातुन झाडे या जातीमधुन निवड झालेली आहे.जातीची चौकशी करूनच त्यांना नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी जय मल्हार सेनेचे संजय कन्नावार यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा.न्यायमूर्ती चंदुलाल मेश्राम यांना निवेदनाद्वारे केली आहे.
गडचिरोली जिल्हयातील झाडे कुणबी हि जमात इतर मागासप्रवर्गात मोडते ते स्वतला झाडे धनगर असल्याचे समजून भटक्या जमाती 'क' चे बोनस जात
प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे धनगर भटक्या जमाती 'क' या प्रवर्गातील आरक्षणावर शासकीय नोकरीत नियुक्ती मिळवित आहेत. गडचिरोली जिल्हयातील पोलीस शिपाई भरती 2022 मध्ये वर उल्लेखीत 3 उमेदवारांची धनगर भटक्या जमाती 'क' या प्रवर्गातून निवड करण्यात आलेली
आहे. तसेच त्याच प्रवर्गात काही उमेदवारांना प्रतिक्षा यादीमध्ये ठेवलेले आहे. वास्तविकता हे आहे की, गडचिरोली जिल्हयात राहणारे 'झाडे' हे 'झाडे कुणबी' असून त्यांचा इतर मागासप्रवर्गामध्ये समावेश होतो. धनगर व तत्सम प्रवर्गातील क्रमांक 15 वर उल्लेखीत असलेले झाडे ही जात गडचिरोली जिल्हयात मुळीच नाही. पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपुर गडचिरोली या जिल्हयामध्ये
झाडे, झाडे कुणबी झाडे सुतार ही जमात आहे भटक्या जमाती मधील 'झाडे' ही पोटजात असून झाडे,झाडे कुणबी,झाडे सुतार यांचा धनगर या प्रवर्गातील काहीच संबंध येत नाही. त्यांची जात ही इतर मागासप्रवर्गात समाविष्ठ आहे. परंतु 'झाडे' या शब्दाचा उपयोग गैर हेतुने करून झाडे कुणबी किंवा इतर कोणत्याही जातीचे लोक गैरमार्गाने भटक्या जमाती 'क' चे जात प्रमाणपत्र मिळवुन आरक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे स्थानिक धनगर प्रवर्गातील उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जात पडताळणी समिती गडचिरोली यांचे वरील संदर्भ क्र.2 अन्वये जात पडताळणी समितीकडुन सबंधितांचे जात वैधता प्रमाणपत्र दिले गेले नसल्याचे माहिती अधिकाराचे पत्राद्वारे उघड झालेले आहे. त्यामुळे वर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिल्यास त्यांची वरील संदर्भ क्रं. 2 अन्वये जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र दिले जात नसल्याने नियुक्तीनंतर जात वैधता प्रमाणपत्राअभावी त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकदा नियुक्त झालेले उमेदवार बडतर्फ करण्याच्या आदेशाला न्यायालयातून स्थगिती आणतात त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. तसेच नियुक्त झालेल्या मुळ प्रवर्गातील उमेदवाराचे नुकसान होत असते.
भटक्या जमाती 'क' प्रवर्गातून निवड झालेले पुरुष महीला याची भटक्या जमाती क' या प्रवर्गातून गैरमार्गाने जात प्रमाणपत्र मिळवून भटक्या जमाती 'क' प्रवर्गातील आरक्षणाचे जागेवर नियुक्ती मिळवित असल्याने तिनही उमेदवारांचे जात वैधता पडताळणी समिती कडुन योग्य ती चौकशी करूनच नियुक्ती आदेश देण्यात यावे तसेच भटक्या जमाती 'क' या मुळ प्रवर्गातील उमेदवारांवर झालेला अन्याय दुर करुन योग्य तो न्याय देण्यात यावे अशी मागणी जय मल्हार सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.