स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढविणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री मा. महादेवजी जानकर साहेब यांनी उदगीर येथे झालेल्या सभेत निर्णय घेतला. जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणूका संदर्भात स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला त्यावेळी जानकर साहेब बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरच लढणार लातूर जिल्ह्य़ाची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके हे पाहतील.असे यावेळी सांगितले. यावेळी मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णु गोरे, आनंद जीवने, परमेश्वर सोमवंशी, राज गायकवाड, उध्दव गायकवाड, धनराज जाधव, निवृत्ती बाजगीर, राजकुमार साळे, गोविंद काताळे, रविंद्र साळे, माधव साताळी, पांडुरंग मदनुरे, सुनिल सुरनर, रामनगर श्रीकृष्ण साताळे, अमोल साताळे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामराव बोडके हे होते सुञसंचालन दिपक साताळे प्रास्ताविक निवृत्ती बाजगीर तर आभार राज गायकवाड यांनी मानले.