"पुष्पगंध"काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा     नव कवी श्री.दौलत शामराव खानेकर यांचे कल्पना विलासातून साकार झालेल्या काव्यसंग्रह "पुष्पगंध" चा प्रकाशन सोहळा दि.१६ मे २०२२ सायंकाळी ६.०० वाजता श्रावणी सेलिब्रेशन हॉल, खांबाडा, तह-वरोरा जि. चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला  आहे.
सदर काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल शिंदे,माजी प्राचार्य महिला महाविद्यालय बल्लारपूर तथा अध्यक्ष संस्थाचालक महामंडळ नागपूर विभाग 
या सोहळ्प्रयाचे मुख अतिथी पद्मश्री डॉ. विकास महात्मे, खासदार राज्यसभा तथा प्रसिद्ध नेत्र तज्ञ नागपूर, डॉ. मंगेश गुलवाडे, उपाध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य तथा नाक, कान ,घसा, तज्ञ चंद्रपूर
डॉ. प्रभाकर लोंढे, प्राचार्य शाहिद जा. ति. जि. प. क. महाविद्यालय गोरेगाव जि.गोंदिया तथा कवी, लेखक, साहित्यिक,गोंदिया
श्री. वामनराव तुरके,सिनेट सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर ह्या मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे.
मराठी काव्याचे सुज्ञ  जाणकार रसिकांनी ह्या कार्यक्रमाला उपस्तीत राहून नव काव्यसंग्रहाचा आनंद घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केले आहे.