बेलदार व तत्सम समाजाचे १८ वें दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन वर्धेतचंद्रपूर :- विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघटना मुख्यालय चंद्रपूर जिल्हा शाखा वर्धा द्वारे बेलदार व तत्सम समाजाचे १८ वे राज्यस्तरीय अधिवेशन उप वर- वधू परिचय मेळावा व या प्रसंगी विवाह सोहळा तसेच दोनदिवसीय मेळाव्यात महीला व बालक, युवकांचे संस्कृतिक कार्यक्रम,फॅशन स्पर्धा चे आयोजन स्थळ सरोज मंगलंम ए.सी.(वातानुकूलित)हॉल राष्ट्रभाषा रोड, सानेवाडी, स्थित वर्धा, येथे दिनांक ७ मे ला सायंकाळी ५.०० वाजता एकल नृत्य स्पर्धा, फॅशन शो स्पर्धा, सामूहिक नृत्य स्पर्धा चे आयाजन असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ्. शिप्रा कासटवार, यशवंत विधी महाविद्यालय वर्धा. सौ. अरुणाताई अ. कोटेवार वर्धा जिल्हा महिला अध्यक्षा, डॉ्. वैशाली मुत्यालवार, प्राचार्या महात्मा गांधी आयुर्वेद महविद्यालय सालोड जिल्हा वर्धा व विविध महिला सामाजिक कार्यकर्त्यांचे उपस्थितीत व विदर्भातून विविध जिल्ह्यातील स्पर्धा सहभागाने संपन्न होणार आहे तसेच
दुसरे दिवशी ८मे ला सकाळीं १०.०० राज्यस्तरीय अधिवेशन व उपवर वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री . डॉ. गोपाल नारळवार, वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रूग्णालय पूलगावजिल्हा वर्धा.यांचे हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान, वामनराव कासावार , माजी आमदार वणी.तसेच श्री. चंद्रशेखर कोटेवार, प्रांतीयअध्यक्ष विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघटना चंद्रपूर. श्री मिलिंद कोपुलवार सदस्य जिल्हा. परिषद वर्धा.श्री. प्रफुल कुचेवार, सदस्य पं. स. वर्धा. श्री. राजेंद्र बधीये, संघटन प्रमूख बेलदार समाज संघर्ष समिति महाराष्ट्र प्रदेश व संघटक संघर्षवाहिनी नागपूर. श्री प्रा.सुमित येलपुरवार जी.बी. एम.एक.कनिष्ठ महाविद्यालय हिंघणघाट.श्री विलास कार्लेकर, क्षेत्रीय प्रबंधक झी लर्नलिमिटेड मुंबई.श्री. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार नाशिक, सौ. प्रभताई चिलके चंद्रपूर इत्यदिंचे प्रमूख पाहुण्याचे उपस्थीत समाजातील श्रीमती कमलाबाई बालुजी चेलमेलवार यांचे चि. संदिप आणि श्रीमती छायाताई दिलीपराव कारडवार यांची कन्या. अंजली यांचे शुभ सामूहिक विवाह सोहळा संपन्न होऊन अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. तेंव्हा वधू- वरास शुभ आशिष देण्यास व राज्यस्तरीय मेळाव्याचे लाभ सर्वांना होण्यास आपण समाजातील मान्यवर , समस्त समाज बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित राहून अधिवेशनाचे शोभा वाढवून आम्हाला उपकृत करावे ,असे आयोजक वर्धा जिल्हा महीला व पुरुष समस्त पदाधिकारी
तसेच संयोजक प्रांतीय कार्यकारिणी पदाधिकारी श्री. चंद्रशेखर कोटेवार, प्रांतीय अध्यक्ष, आनंदराव अंगलवार प्रांतीय कार्याध्यक्ष , रवींद्र बंडीवार प्रांतीय सचिव, सर्व उपाध्यक्ष अरविंद गांगुलवार संजय कोट्टेवार प्रा.राजेंद्र कात्रटवार, राजेश भंडारवार, विनायक वद्देवार, तसेच सर्व जिल्हा प्रमुखसुधीर ताटेवार वर्धा, प्रमोद एडलावार चंद्रपूर, किष्टना मुत्यालवार यवतमाळ, अण्णाजी गुंडलवार नागपुर, प्रकाश शंखदरवार गडचिरोली, मनिष कन्नमवार, सचिन चलकलवार, अविनाश अंकलवार, छबन पुप्पलवार आनंद कार्लेकर , रुचाताई आडपेवार , श्रद्धा एडलवार,चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर महीला अध्यक्षा, साक्षी कार्लेकर चंद्रपूर.यांनी एका पत्रकान्वये आवाहन केले आहे.