▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

महानगरपालीकेचे विपीन पालीवाल यांची उचलबांगडी तर राजेश मोहीते आयुक्त पदी पुन्हा वर्णीचंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी राजेश मोहिते यांची पुन्हा वर्णी लागली आहे. या संदर्भातील पत्र 11 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास नगर विकास मंत्रालयाने जारी केले आहे.महानगरपालीकेचे विपीन पालीवाल यांची उचलबांगडी झाली आहे तर राजेश मोहीते यांची आयुक्त पदावर पुन्हा वर्णी लागली आहे.त्यामुळे राजकिय गोटात तर्कवितर्क लावले जात आहे.

श्री राजेश मोहिते हे मागील दोन वर्षांपासून चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते. मात्र जानेवारी महिन्यात त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांना आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आला होता. मात्र 11 मार्च रोजी नगरविकास मंत्रालयाने पुन्हा फेरबदल करीत राजेश मोहिते यांच्याकडे आयुक्तपदाची सूत्रे सोपविली आहे.

Rajesh Mohite re-appointed as Municipal Commissioner, orders issued late at night