सिटीपीएस च्या कॅन्टिनमध्ये खाद्यपदार्थांच्या कच्च्या साहित्याची पायाने तुडवणूकजगातील सर्वात मोठ्या विद्युत निर्माण करणारे केंद्र असलेला ऊर्जा नगर चंद्रपूर येथे युनिट क्रमांक 8 व 9 मध्ये कामगारांसाठी अल्पोपहार देण्यात येणार्‍या कॅन्टीनमध्ये काल मध्यान्हात चक्क पायाने आलू(बटाटा) तुडवीत असल्याचे कामगारांच्या निदर्शनात आले.पायाने आलु तुडविणाऱ्या त्या मजुराचे येथील स्थानिक कामगारांनी उपहारगृहाचे बाहेर आणुन त्यांचेे बयाणाचे  व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर वाॅयरल करण्यात आले आहे. कामगारांना स्वस्त जेवण व इतर फराळाचे साहीत्य मिळण्यासाठी चंद्रपुर थर्मल पावर स्टेशन तर्फे उपहार गृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपहारगृहासाठी करोडो रुपयाचे कंत्राट इंडीयन कॅपे इंदोर यांना कंत्राट देण्यात आले आहे. मात्र अशा या उपहारगृहामध्ये खाण्याचे कच्चे साधन सामुग्री आलु चक्क पायाने तुडवीत असल्याचे कामगारांनी आपल्या डोळ्यासमोर बघीतल्याने कामगारांना तोंडांत बोटच ठेवावे लागले.या उपहारगृहात केरला, चेन्नई व ईतर परप्रांतीय कामगार येथे काम करीत आहेत. या परप्रांतीयाकडून अश्या प्रकारचे कृत्य होईल असे कोणालाही वाटत नाही.या उपहारगृहात उच्च अधिकारी सुध्दा कर्मचारी व कामगार नाष्टा जेवण करीत असतात.त्याच्या डोळ्या आड असे कृत्य केले जात असेल तर लाजीरवाणी गोष्ट आहे.उपहारगृहातील जेवण,समोसा,आलुभजे,दोसासाठी यासाठी आलुचे(बटाटा) मिश्रण बनवायचे होते.त्यासाठी येथील कामगारांनी पायात चप्पल घालून आलुचे मिश्रण बनवित असल्याचे कामगारांना दिसून आल्याने हा किळसवाणा प्रकार सध्या सोशल मीडीयावर चांगलेच चर्चेत आहे याकडे मुख्य अभियंता कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे