वाघाचे दात,नखांसह 5 आरोपींना अटक नागपूर वनविभागाची कार्यवाही!चंद्रपूर प्रतिनिधी:- नागपूर वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उमरेड बसस्थानकचे जवळ वाघाच्या दातांची विक्री होणार असल्याचे कळताच nagpur वनविभागातील दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाव्दारे सापळा रचुन 3 आरोपींना अटक करण्यात आले. त्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींचे चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे व सायबर सेल, मेळघाट यांच्या मदतीने आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आले. उक्त प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपींची नावे अनुक्रमे 1) ताराचंद महादेव नेवारे, वय 41 वर्ष, रा.खडकळा, 2) दिनेश कवटु कुंभले. वय 30 वर्ष, रा. वाढोणा, 3) अजय राजुजी भानारकर, वय 24 वर्ष, रा. वाढोणा, 4) प्रेमचंद वाघाडे, वय 50 वर्ष, रा.सोनपुर (तुकूम), पो.पळसगांव, व 5) राजु कुळमेथे, वय 38 वर्ष, रा. खडकळा असे सर्व ता. नागभिड, जि. चंद्रपुर येथील आरोपी असून त्यांचे विरुध्द वनगुन्हा क्र.04882/122035 दि. 23/11/2021 अन्वये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 चे विविध कलमाव्दारे वनगुन्हा नोंदविण्यात आला.

मौजा उमरेड, ता. उमरेड येथुन दुपारी 12.45 वा. सुमारास आरोपींना ताब्यात घेण्यात आले. उक्त प्रकरणी आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा संशयावरून आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता श्री. एन.जी. चांदेवार, सहाय्यक वनसंरक्षक, उमरेड उपविभाग, उमरेड यांनी दर्शविली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी राजु कुळमेथे हे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असून आरोपी ताराचंद नेवारे हे PRT चे सदस्य आहेत.

सदर कार्यवाही मा.श्री.पी. कल्याणकुमार, मुख्य वनसंरक्षक (प्रा.), नागपूर वनवृत्त, नागपूर, डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख श्री. एन. जी. चांदेवार, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-2), उमरेड, कु. कोमल एम. गजरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, दक्षिण उमरेड यांचे समवेत श्री. चौगुले, श्री. अगळे, श्री. भिसे सर्व वनपाल व श्री. कॉपले, श्री. नरवास, श्री. पेंदाम, श्री. श्रीरामे, श्री. हेडावू सर्व वनरक्षक आणि इतर दक्षिण उमरेड व उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांनी यशस्वी धाड पार पाडली. प्रस्तुत प्रकरणी पुढिल तपास श्री.एन.जी. चांदेवार, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-2), उमरेड हे करीत आहेत.