वासनाधिन नराधमाने चक्क कुत्री वर केला अनैसर्गिक कृत्यचंद्रपूर :- मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विकृत युवकाने आपल्या वासनेची भूक मिटविण्यासाठी चक्क कुत्रीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या किळसवाण्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहरातील नागपूर मार्गावरील वाहन शोरूम लगतच्या जागेत ही घटना घडली. प्रकाश डाफ असं या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. या माथेफिरू तरुणाने रस्त्यावर असलेल्या एका कुत्रीवर शोरूमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत नेऊ तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. हा सगळा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला.त्यानंतर स्थानिकांनी या घटनेबद्दल प्यार फाउंडेशन प्राणीमित्र संघटनेला याची माहिती दिली. संघटनेच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तसंच या संघटनेनं पोलिसांना याची माहिती दिली.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी प्रकाश डाफ याला अटक केली आहे. त्याच्यावर कलम 377 नुसार शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.