▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

नवरगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरीनवरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून सोशल डिस्टंटींगचा नियम पाळत जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.या वेळी समाजाचे महीला ग्रा.प.सदस्य सौ.शोभाताई दुर्कीवार,ग्रा.प.सदस्य भोलेश्वर ईदुलवार,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर कंकलवार, राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते व पत्रकार संजय कन्नावार,सौ.ताराबाई डेंकरवार,आदी उपस्थित होते.यावेळी समाजाचे अध्यक्ष व नवरगाव तंटामुक्ती अध्यक्ष बिर्राजी जिगरवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.अहिल्यादेवीचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी समाज बांधवांनी तथागत गौतम बुद्ध,महात्मा ज्योतिबा फुले,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,यांच्या मूर्तीची पूजन करण्यात आले.
यावेळी जय मल्हार वाढणी मंडळ व समाजातील युवकांनी अतीक्षय परीश्रम घेऊन अहील्यामाई जन्मोत्सव साजरा केला.अहील्यामाई जन्मोत्सवानिमित्त माताआई परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.