गडचांदुर मध्ये आदिवासींच्या जमिनी अवैधपणे विक्री करण्याच्या गोरखधंद्याला ऊत !कोरपना : कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरामध्ये आदिवासींची जमीन अल्पशा रकमेमधून घेऊन ती मोठ्या रकमेमध्ये विकण्याच्या गोरख धंदा मागील काही वर्षापासून सुरू आहे. "आवळा देवून भोपळा" घेण्याच्या प्रकार मागील दोन वर्षापासून वाढला आहे यावर त्वरित निर्बंध लावण्यात यावे, या संदर्भात राजूऱ्याच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून हा प्रकार त्वरित बंद व्हावा अशी मागणी गडचांदूर नागरीकांनी केली आहे‌.

सविस्तर वृत्त असे की कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरामध्ये मागील अनेक वर्षापासून अशिक्षित व गरीब आदिवासी बांधवांची लाख-मोलाची जमीन कवडीमोल दामा मध्ये खरेदी केले जात आहे व त्याची करोडो च्या रकमेमध्ये विक्री केले जात आहे‌. यासंदर्भात शासन दरबारी तक्रारी झाल्या असूनही त्यावर कोणतेही निर्बंध लावण्यात आले नाहीत. अद्यापही हा गैरकारभार गडचांदूर शहरांमध्ये मोठ्या स्तरावर सुरू आहे. महत्वाचे म्हणजे शासनाने आदिवासींच्या जमिनी खरेदी न करण्याचे चा शासनाचा जि. आर. असतांनासुद्धा असे प्रकार खुलेआमपणे गडचांदूर शहरांमध्ये सुरू आहे. अनेक राजकीय पुढारी व स्वतःला समाजसेवी म्हणणारे "कारतोंडे" या गैरप्रकारात सामील आहेत. लॉकडाऊननंतर उद्भवलेली परिस्थिती बघता अनेक आदिवासींनी आपल्या जमिनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विक्री करून घेण्यात आले आहेत, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विक्री करण्यात आलेल्या या जमिनींच्या सौदा रद्द करण्यात यावा ज्यांनी या खरेदी केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. चंद्रपूरच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी गडचांदूर मध्ये कवडीमोल दराने विक्री झालेल्या या जमिनींचे सौदे रद्द करावी व त्वरित खोटे दस्तऐवज सादर करून जमिनी खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.