जिल्हा परिषद व पंचायती समिती पोट निवडणूकचंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे निर्देशान्वये सिंदेवाही तालुक्यातील 18 – मोहाडी-नलेश्वर-वासेराव व राजुरा तालुक्यातील 54 – चुनाळा-विरुरस्टेशन या 2 जिल्हा परिषद रिक्त पदांच्या पोट निवडणूकांसाठी तसेच भद्रावती तालुक्यातील 41- पाटाळा, चंद्रपूर तालुक्यातील 62-पडोली, मूल तालुक्यातील 68-मारोडा व 69-जुनासुर्ला या 4 पंचायत समितीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणूकांसाठी प्रारुप मतदार यादी दि. 18 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रारुप मतदार यादीवर संबधित तहसिलदार यांचेकडे हरकती व सुचना दिनांक 18 ते 26 फेब्रुवारी 2021 या कालावधीत संबंधीत नागरिकांनी दाखल कराव्या, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रियंका पवार यांनी कळविले आहे.