गोंडपिपरी :-देशभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना व नुकतेच उत्तर प्रदेशातील हाथरस गावात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर याचे सर्वत्र प्रतिसाद उमटत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. आजोबाच्या अंत्यविधीच्या दिवशीच कुटुंब शोकात बुडालेले असताना दुसरीकडे घरातीलच चुलत काकाने १२ वर्षीय पुतणी वर अंधार्या रात्रीत अमानुष अत्याचार केला या घटनेचे तीव्र निंदा केली जात असून समाज वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गोंडपिपरी तालुक्या पासून दहा किलोमीटर अंतरावर येनबोथला गावात मोरेश्वर राऊत यांच्या वडिलांचे काल निधन झाले .दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घरातील मंडळी अंतविधी ला आलेल्या पाहूण्यासह जेवण करायला बसले असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या काकाने आपल्याच अल्पवयीन पुतनी वय १२ वर्ष हिच्यावर काळी नजर ठेवली. पाहुण्याला जेवण देत असताना सदर मुलगी घरातून बाहेर निघाली असताना कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधत आरोपी कमलाकर राऊत वय २६ वर्ष याने तिला ओढत घराजवळच असलेल्या सांदवाडीत नेले व तिच्यावर बळजबरी करून बलात्कार केला काहीवेळात मुलीचे वडील मोरेश्वर राऊत हे घराबाहेर लघुशंकेला निघाले असताना त्याला आपल्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला आवाजाच्या दिशेने मुलीचे वडील गेले असता घटनास्थळावरून आरोपी कमलाकर यांने पळ काढला. मुलीची अवस्था पाहून वडील चक्रावून गेले घरी आणत तिला विचारपूस केली असता काकाने आपल्यावर बळजबरीने ओढत नेत बलात्कार केल्याची माहिती तिने घरच्यांना सांगितले. एवढंच नाही तर पावसाळ्यात यापूर्वी देखील मोरेश्वर राऊत यांनी माझ्यावरती शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता व ही माहिती कुणाला सांगितली तर तुला जीवे मारेल अशी धमकी सुद्धा दिली होती त्यामुळे भीतीपोटी मुलीने आपल्या काका चे काळे कृत्य घरच्यांना सांगितले नाही.मुलीवरती झालेला अत्याचार पाहून आईवडिलांनी लगेचच रात्री अकरा वाजता गोंडपिपरी कडे धाव घेत पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संदीप धोबे यांनी आपल्या सहकार्यांसह येनबोथला गाव गाठले व गावा पासून एक किलोमीटर असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ लपून असलेल्या आरोपी कमलाकरला ताब्यात घेत त्याच्यावरती गुन्हा दाखल केला तर पीडित मुलीला मेडिकल करण्याकरिता चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे सदर आरोपीविरुद्ध ३७६,३७६(२)(I)(N)(F)५०६,४,६ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोस्को टीम राजुरा यांच्याकडे तपास दिला आहे सदर घटनेची माहिती मिळताच मूलचे उपविभागीय अधिकारी अनुज तरे यांनी घटनास्थळी भेट देत प्रकरणाची माहिती घेतली सदर घडलेल्या प्रकाराची तालुक्यात सर्वत्र निंदा होत असून घडलेल्या अमानुष कृत्याबाबत निषेध केल्या जात आहे.