▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर



चंद्रपूर दि. 1 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 1 सप्टेंबर मंगळवार व 2 सप्टेंबर बुधवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादिवशी ते ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करुन आढावा घेणार आहेत.

1 सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे पुरपरिस्थिती बाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी 4 वाजता ब्रह्मपुरी तालुक्यातील पुरग्रस्त भागाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणार आहेत. शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.

2 सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत ब्रह्मपुरी तालुक्यातील अधिकाऱ्यांसमवेत पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे त्यांचा वेळ राखीव असणार आहे. दुपारी 12:30 ब्रह्मपुरी वरून तालुका सावलीकडे प्रयाण करतील. दुपारी 1:30 वाजता सावली तालुक्यातील अधिकाऱ्यांसमवेत पुरग्रस्त भागाची पाहणी करतील. सायंकाळी 4 वाजता सावली तालुक्यातील व्याहाळ खुर्द येथे काँग्रेस कार्यालय येथे आगमन होणार असून पुर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी 5 वाजता व्याहाळ खुर्द येथुन गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व पुर परिस्थिती बाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. रात्रीला शासकीय विश्रामगृह, रानफुल निवास गडचिरोली येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.