पंचायत समिती गोंडपीपरी येथे अनेक कामाने आजूबाजूच्या खेड्यातून अनेक लोक पंचायत समितीला दररोज येत असतात , गोंडपीपरी तालुक्यातील कोरोनाची वाढत असलेली परिस्थिती लक्षात घेता,सभापती सौ.सुनीता भानेश येग्गेवार यांनी आम. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे सॅनिटायझर मशीन ची मागणी केली होती, लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांनी काही तासातच सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून दिली .
आज पंचायत समिती गोंडपीपरी येथे सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण सभापती सौ.सुनीता भानेश येग्गेवार यांच्या हस्ते संपन्न झाले .काही तासातच मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकनेते सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे पंचायत समिती सभापती व उपसभापती आणि पंचायत समिती सदस्यांनी आभार मानले.
त्यावेळी बबन निकोडे भाजपा तालुका अध्यक्ष गोंडपीपरी ,अरुण कोडापे उपसभापती पंचायत समिती गोंडपीपरी, कुसूमताई ठुमने पंचायत समिती सदस्य,राकेश पुन,चौधरी सर, संजय झाडे, मारोती झाडे,नितीन ढवस साहेब,देवतळे साहेब,सवसाकडे साहेब उपस्थित होते.