▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

नवरगाव ग्रा.पं. मध्ये घरकुल वाटपात घोळ !


बेघरांना डावलून सधन व घरे असलेल्यांना वशिल्यातून व देवाणघेवाणीतून मिळाली घरे !


सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ग्रा.पं. मध्ये ४७३ लोकांची घरकुल यादी मंजूर करण्यात आली. त्यात ग्रा.पं.कर्मचारी असलेल्या व्यक्तींना व शेती व घर चांगले असलेल्यांना घरकुल मंजूर करण्यात आले ‌.त्यामुळे घरकुल योजना फक्त आपल्या मर्जीतील लोकांना घरकुल योजनेचा फायदा देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. घरकुल मंजूर करतांना ज्या नियम व अटी शर्तीच्या आधारावर ते मंजूर व्हायला पाहिजे, त्या शासन नियमावलीला ग्रामसेवक व BDO यांनी संगनमताने हा भोंगळ कारभार केल्याचे स्पष्ट होत आहे.
सिन्देवाही तालुक्यातील नवरगाव हे सर्वात मोठे गाव आहे.राजकारणाची भुमी आणि आरएसएसची कर्मभूमी असलेल्या गावात एकतर्फी निर्णय घेतला जात असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाने गरीब असलेल्या जनतेला घरकुल योजनेचा लाभ दिला मात्र सिन्देवाहीचे bdo नी आपल्या मर्जीतील लोकांना घरकुल मंजूर केला, या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.




नवरगाव येथील ग्रामपंचायत तर्फे नालीचे बांधकाम करण्यात येत असून ठेकेदाराने भारतीय संचार निगम लिमिटेडचे अंडर ग्राउंड असलेल्या तारांचे तोडताड केल्याने बि एस एन एल ची सेवा खंडित झाली आहे.त्यामुळे बि एस एन एल ग्राहकांना नाहक त्रास घ्यावा लागत आहे. बि एस एन एल सोबत जोडलेल्या ग्राहकांना व संबंधित कार्यालयांना यांचा भुर्दंड बसत आहे.
नवरगाव परीसरातील जवळपास ९ ते १० गावे बॅक आॅफ इंडीयाच्या संबधीत असल्याने दररोज ये-जा सुरू असते.मात्र बॅकेचे आॅनलाईन व्यवहार टप्प असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.