▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

उमेशने केला सख्या भावांच्या आठ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग !चंद्रपुर : चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डात आज एकाने नाबालिकेवर सख्या नातेवाईकाने अतिप्रसंग केला. उमेश नावाच्या हा निर्दयी व्यक्ती आपल्या सख्ख्या मोठ्याच्या बहिणी च्या मुलीवर अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून 376, पास्को अंतर्गत उमेश शिल यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती घेण्यासाठी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या 071 72- 252 200 या नंबर वर संपर्क केला असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. सदर माहिती मिळावी यासाठी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार बहादुरे यांच्या सोबत संपर्क केल्यानंतर त्यांनी माहिती स्टेशन डायरी वरून घ्या अशी पुष्टी जोडली. स्टेशन डायरी वर पुन्हा फोन केल्यानंतर मिलिंद नावाच्या कुण्या व्यक्तीने फोनवर माहिती देण्यात येणार नाही असे सांगून स्वतः पोलीस स्टेशनला या आणि माहिती घ्या अशी अवास्तव सूचना केली. त्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार बहादूर यांनी उमेश नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात सोळंकी मॅडम यांच्याकडे चौकशी असल्याचे सांगितले. एखाद्या घटनेमध्ये माहिती मिळण्यासाठी पत्रकारांनी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावणे आवश्यक नाही गुन्हा नोंद झाला तर त्याची माहिती स्टेशन डायरी मधूनच मिळायला हवी असे चुकीचे प्रकार जर जिल्ह्यांमध्ये घडत असेल तर त्याकडे चंद्रपूरचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी व चंद्रपुर चे पोलिस अधीक्षक यांनी व्यक्तिगत लक्ष देणे गरजेचे आहे.

स्थानिक भिवापूर वॉर्डात उमेश शील याचे नाव्ह्याचे दुकान आहे. प्रांतिक कॉलनी बंगाली कॅम्प परिसरात यांचे राहणे असून आरोपी उमेश शील यांच्या यांचे मोठे भाऊ यांच्या बहिणीची आठ वर्षाच्या मुलीवर हा अतिप्रसंग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चारित्र्यहीन उमेश शील याने आपल्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार केल्याची वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार अतिप्रसंग झालेली मुलगी ही मंदबुद्धी होती. उमेश वेळ प्रसंग पाहुन या मुलीला लालच देऊन आपल्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर हा अतिप्रसंग केला. अत्यंत लाजिरवाणी असणाऱ्या या घटनेने या परिसरात असंतोष पसरला आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार भिवापूर वार्डामध्ये असलेल्या त्याच्या न्हाव्याच्या दुकानांमध्ये या मुलीला आणून ठेवत असल्याची माहिती मिळाली आहे. मुलीचे आई-वडील हे मोलमजुरी करणारे असून या प्रसंगामुळे ते मानसिकरित्या खचलेले आहेत. महत्वाचे म्हणजे उमेश शील हा अनेक मोठ्या व्यक्तींच्या संपर्कात होता, त्यांच्या शरीराची मालिश करण्यापासून तर त्यांचे वाह्यात शौक पूर्ण करण्यापर्यंत चा व्यवसायात सुद्धा तो असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तपास केल्यास अनेक अविश्वसनीय कारनामे उघडकीस येऊ शकतात. अंधविश्वास सुरू असलेला उमेश शील हा अनेक ठिकाणी बांधला होता अशी चर्चा परिसरात होऊ घातली आहे. चंद्रपूरचे कर्त़व्यदक्ष पोलिस अधीक्षक यांनी प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतल्यास या प्रकरणाला वेगळे वळण मिळू शकते.