ओबीसी विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश लागू


केंद्रीय नवोदय विद्यालयात ओबीसी विद्यार्थ्यांना 27% आरक्षण नवोदय विद्यालय समितीने शैक्षणिक सत्र सन 2020-21 ह्या सत्रापासून लागू केले आहे. त्यामुळे देशभरातील ओबीसी विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवोदय विद्यालयात ओबीसी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मागील अनेक वर्षापासून केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. या मागणीची दखल घेऊन देशभरात नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे. नवोदय विद्यालयाचे शिक्षण उच्च दर्जाची असल्यामुळे यात प्रवेश घेण्यासाठी अनेक ओबीसी विद्यार्थी प्रयत्नरत होते. मात्र गुणवत्ता असून देखील आरक्षण नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुकावे लागत होते. सदर बाब राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या लक्षात येतात केंद्रशासन व नवोदय विद्यालय समिती यांच्याकडे आरक्षण लागू करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेऊन केंद्रीय विद्यालय समितीने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी देशभरात केंद्रीय विद्यालय प्रवेशासाठी 27 टक्के आरक्षण लागू केले आहे. यामुळे देशभरातील सेंटल लिस्ट मध्ये असणाऱ्या सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.सण 2020-2021 या सत्र मध्ये प्रवेशा साठी परीक्षा घेण्यात येणार आहे या साठी अर्ज करावा असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ बबनराव तायवाडे, डॉ खुशालचंद्र बोपचे, डॉ अशोक जीवतोडे, सचिन राजुरकर , प्रा शेषराव येलेकर, खेमेन्द्र कटरे, शाम लेडे यांनी केले आहे.