▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

कोळसा माफिया मालामाल वेकोली होत आहे बेहाल!


पडोली व नागाडा कोल डेपोत कोळसाची भरमार                                                         देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागल्यानंतर पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली. देश कोरोना ने त्रस्त झाला आहे .वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे.अत्यावश्यक वाहनाशिवाय इतर कुठलेही वाहने सिमेबाहेर सोडले जात नाहीत .मात्र कोळसा माफियांचा वाहनांना खुलेआम सोडण्यात येत आहेत.
कोळश्याची जननी असलेल्या चंद्रपुरात कौळसा चोरी ही नेहमीचीच झाली आहे. कोळसा चोरीत अनेक पांढरपेशा तस्कर मालामाल झाले आहे. सबसिडी चा कोळसा जास्त दराने चोर बाजारात विक्री करून आशिष-कैलास-रामप्रसाद सारखे तस्कर आज या क्षेत्रात अव्वल आहेत.वेकोलीच्या खदानातून निघालेला कोळसा या कोळसा माफियांना कवडी मोल दरात विकल्या जाते.व तो कोळसा याकोळसा  माफियांचा टालकोळसावर जमा केली जाते. कोळसा माफियांनी सर्व धाब्यावर बसवून कोळसा चोर कोळसा खदानीतून मनमानी कोळशाची नियमबाह्य उचल करीत आहे.
चंद्रपुरातील पडोली व व नागाडा येथे कोल डेपोवर या बंद चा फायदा उचलून सबसिडी चा कोळसा जमा करण्यात आला. चंद्रपुर डी.आर.सी. च्या खाणीतून मोठ्या प्रमाणात सबसिडीच्या कोळशाची उचल होत आहे. प्राप्त माहितीनुसार देशात संचारबंदी दरम्यान संपुर्ण वाहतुक बंद असताना ही या खाणीतुन कोळशाची उचल करून ती रात्रोच्या अंधारात कोल डेपोवर जमा करण्यात येत होती. हे काम कोळसा चोर साखळी बनवून करीत असल्याची माहिती आहे. याबद्दल यापुर्वीही वृत्ताच्या माध्यमातुन या चोरीचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर ही कोळसा चोरांनी ही चोरी सर्रास सुरू ठेवली आहे. महत्त्वाचे म्हणजे नुकतीच अत्यावश्यक सेवा शासनाच्या आदेशाने सुरू करण्यात आली आहे. विज उत्पादन हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते. त्याठिकाणी लागणारा कोळसा वाहतुक करता यावा, असा नियम आहे, यासाठी वाहतुक करणार्या वाहनांना RTO मधून परवानगी घेणे गरजेचे आहे, कोळसा चोरांनी या नियमाला धाब्यावर बसविल्याचे स्पष्ट दिसत आहे. D.O. च्या नियमांचे उल्लंघन करून रात्रो खाणीतुन गाड्या load करून पहाटे त्या कोल डेपोसाठी सोडल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कार्यालयीन वेकोली अधिका-यांना शिथीलता देण्यात आली आहे. काही मोजके कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी आपली ड्यूटी बजावत आहे, याच संधीचा फायदा घेत वेकोलीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना "आशिष" देवून ही कोळसा चोरी जोरात सूरू आहे. चंद्रपुर दुर्गापूर रय्यतवारी काॅलरी व महाकाली काॅलरी  येथून मनमानी कोळसा डोहाळल्या जाऊन तो पडोली व नागाडा येथील कोल डेपोवर रिकामा करून चोर बाजारात अव्वाच्या सव्वा दराने विकून कोळसा चोर मालामाल तर वेकोलीला कंगाल करण्याचे कार्य भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने चंद्रपुर G.M. खाणीत सूरू आहे, यावर त्वरित निर्बंध लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.