संपूर्ण देश कोरोना व्हायरसमुळे चिंतेत असताना, नोबेल पुरस्कार विजेत्या संशोधकांनी एक दिलासादायक दावा केला आहे. स्टॅनफोर्ड बायोफिजिसिस्ट मायकल लॅविट यांनी कोरोनाचा अंत जवळ असल्याचं सांगितलंय. कोरोनामुळे जितकी वाईट परिस्थिती यायची होती, ती येऊन गेली आता परिस्थिती सुधारणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.लॅविट यांनी 'लॉस एंजेलिस टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. त्यांचा हा दावा अतिशय गंभीरतेने घेतला जात आहे. कारण, चीनमध्ये कोरोना व्हायरसबाबत त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरतेय. चीनमध्ये पसरणाऱ्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येण्यााबाबत त्यांनी सांगितलं होतं. जगभरातील तज्ज्ञांनी, चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येण्याबाबत वेळ लागणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु मायकल यांनी कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन लवकरच ती नियंत्रणात येणार असल्याचं सांगितलं होत यांनी फेब्रुवारीमध्ये, चीनमधील परिस्थिती सुधारणार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर हळू-हळू चीनमधील परिस्थिती सुधारताना दिसतेय. चीनममध्ये कोरोना व्हायरसवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. कोरोनाचं सर्वात मोठं केंद्र असलेला वुआनही आता लॉकडाऊननंतर पुन्हा सुरु होण्याच्या, पुर्ववत होण्याच्या मार्गावर आहे. लॅविट यांनी चीनमधील कोरोना रूग्ण आणि मृत्यूचा अचूक अंदाज लावला होता. त्यांनी चीनमध्ये कोरोनाची 80,000 प्रकरणं आणि 3250 मृत्यू होऊ शकत असल्याचा अंदाज वर्तवला होता. मंगळवारपर्यंत चीनमध्ये 3277 मृत्यू आणि 81171 कोरोनाची प्रकरणं समोर आली आहेत. मायकल लॅविट यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावर सोशल डिस्टंसिंग सर्वात गरजेचं आहे. मोठ्या संख्येने लोक एकत्र जमणं हे धोकादायक आहे. हा व्हायरस नवीन आहे. जगभरातीन अनेक लोकांकडे या व्हायरसशी लढण्याची शक्ती कमी आहे. कोरोनावर अद्याप औषध नाही. परंतु सुरुवातीची ओळख गरजेची आहे. टेस्टिंगसाठी शरीराचं तापमान तपासणं आवश्यक आहे. चीनमध्ये हाच फॉर्म्यूला लागू करण्यात आला. सध्या सोशल आयसोलेशल यामुळेच कोरोनावर मात करता येऊ शकते