नव्या आघाडीची स्थापना होणार! भाजपची डोकेदुखी वाढणार?A new alliance will be established! BJP's headache will increase?



राज्याच्या राजकारणात आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष Self-respecting Farmers Association, National Samaj Party, Farmers Workers Party हे एकत्र येणार आहेत. त्यादृष्टीने चर्चा झाली असून यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव Telangana Chief Minister K. C. Rao यांच्या भारत राष्ट्र समितीसह Bharat Rashtra Samiti अन्य काही पक्षांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा Lok Sabha and Vidhan Sabha निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच या सर्व पक्षांच्या आघाडीची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.


राज्याच्या राजकारणात स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाविकास आघाडी आणि भाजप व शिवसेना BJP and Shiv Sena युतीबरोबर काही काळ होती. पण दोन्हीकडून अपेक्षाभंग झाला. यामुळे संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील रासप सध्या भाजपसोबत आहे. पण गेल्या चार वर्षात या पक्षाकडे भाजपने दुर्लक्ष केले आहे. यामुळे जानकर नाराज आहेत. शेतकरी कामगार पक्षाचीही महाविकास आघाडीकडून अशीच अवस्था करण्यात आली. यामुळे हे सारे पक्ष नाराज आहेत.


राज्याच्या राजकारणात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्र आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीबद्दल सहानुभूती असल्याचे मतदानाद्वारे सिद्ध झाले आहे. यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर मोठे पक्ष हे छोट्या पक्षांना गृहित धरून राजकारण करत असल्याने त्यांनी आता उपद्रवमूल्य वाढविण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वांनी एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.




नव्या आघाडीच्या स्थापनेची पहिली पायरी म्हणून स्वाभिमानी आणि रासप यांनी आघाडीसाठी चर्चा सुरू केली आहे. सोबत शेकाप, भारत राष्ट्र समिती यासह अन्य काहींना घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वाभिमानीची पश्चिम महाराष्ट्रात ताकद आहे. रासपची सर्व मतदार संघात मते आहेत. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून के. सी. राव महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोकणात अजूनही शेकाप आहे. हे सारे एकत्र आल्यास निवडून येण्याची शक्यता कमी असली तरी पाडापाडीत काही ठिकाणी ते निश्चितच यशस्वी होऊ शकतील. असे झाल्यास महाविकास आघाडीसह भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.



"स्वाभिमानी आणि रासपची राज्यभर ताकद विखुरली आहे. आमच्यासह अन्य काही पक्षांना सोबत घेऊन नवी आघाडी आम्ही स्थापन करणार आहे. त्या दृष्टीने पहिली बैठकही झाली आहे. लवकरच याला वेग येईल."
- महादेव जानकर, माजी मंत्री, अध्यक्ष रासप