....अखेर आसारामला जन्मठेपेची शिक्षा Finally Asaram was sentenced to life imprisonment



गांधीनगरghandinager : सुरत suratयेथील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी आसारामला दोषी ठरवले. यापूर्वी 25 एप्रिल 2018 रोजी जोधपूर न्यायालयाने आसारामला उत्तर प्रदेशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली Sentenced to life imprisonmentहोती.

या प्रकरणात आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपी होते. न्यायालयाने आसारामला दोषी ठरवले. खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला. उर्वरित पाच आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

काय आहे प्रकरण What is the matter


2013 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुमारे 10 वर्षांपूर्वी सुरतमधील एका महिलेने आसाराम याच्यावर अहमदाबादच्या Ahmedabadआश्रमात वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी अहमदाबादमधील चांदखेडा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, २००१ ते २००६ दरम्यान अहमदाबाद शहराच्या बाहेरील एका आश्रमात महिलेवर अनेकदा बलात्कार झाला होता. तेव्हा ही महिला आसारामच्या आश्रमात राहात होती.पोलिसांनी जुलै 2014 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.



दोन बहिणींच्या बाप-बेट्याविरोधात तक्रारी
Complaints against father and son of two sisters




आसारामचा मुलगा नारायण साई Narayan Sai याच्या पीडीत महिलेच्या लहान बहिणेने तर मोठ्या बहिणीने आसारामविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. मोठ्या बहिणीची तक्रार गांधीनगरला हस्तांतरित केल्यामुळे आसारामवर गांधीनगरमध्ये खटला चालवण्यात आला. त्यात न्यायालयाने सोमवारी आसारामला दोषी ठरवले. सरकारी वकील आर सी कोडेकर आणि सुनील पंड्या यांनी ही माहिती दिली.


साक्षीदारांवर प्राणघातक हल्ले

28 फेब्रुवारी 2014 रोजी सुरतमधील दोन पीडित बहिणींपैकी एकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर 15 दिवसांनी आसारामचे व्हिडिओग्राफर राकेश पटेल Videographer Rakesh Patelयांच्यावरही हल्ला झाला. हल्ल्यानंतर काही दिवसांनी सुरतमधील कापड बाजारात साक्षीदार दिनेश भगनानीवर अॅसिड फेकण्यात आले होते. हे तिन्ही साक्षीदार या हल्ल्यातून बचावले. 23 मार्च 2014 रोजी अमृत प्रजापती या साक्षीदाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 17 दिवसांच्या उपचारानंतर अमृतचा मृत्यू झाला.


आशुमल आसाराम झाला Ashumal became Asaram





आसारामचे खरे नाव आशुमल हरपलानी Ashumal Harpalani आहे. त्याचा जन्म एप्रिल 1941 मध्ये पाकिस्तानातील सिंध प्रांतातील बेरानी गावात झाला. 1947 च्या फाळणीनंतर हे कुटुंब अहमदाबादमध्ये स्थायिक झाले. 1960 च्या दशकात आसाराम यांनी लीलाशाह यांना आपला गुरू बनवले. आसारामने दावा केला आहे की गुरूंनी आपल्याला आसुमल ऐवजी आसाराम हे नाव दिले आहे. 1972 मध्ये आसारामने अहमदाबादपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोटेरा गावाजवळ साबरमती नदीच्या काठावर आश्रम बांधले.


असा वाढला प्रभाव


सुरुवातीच्या काळात आसारामने गुजरातच्या खेड्यापाड्यातील गरीब, मागासलेल्या आणि आदिवासींना आपले प्रवचन वभजन-कीर्तनाने आकर्षित केले. त्यानंतर हळूहळू गुजरातच्या शहरी भागातील मध्यमवर्गात त्याचा प्रभाव वाढू लागला. सुरुवातीच्या काळात आसाराम यांच्या प्रवचनानंतर प्रसादाच्या नावाने मोफत भोजन दिले जात होते. आसारामच्या अनुयायांची संख्या हळूहळू वाढू लागली आणि गुजरातमधील अनेक शहरांमध्ये आणि देशातील विविध राज्यांमध्ये त्यांचे आश्रम उघडू लागले.