विदर्भात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार.. प्रा. ऍड. रमेश पिसे



नागपूर :- राष्ट्रीय समाज पक्ष विर्भातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असून प्रत्येक लोकसभा क्षेत्रात 2000 बूथ प्रमुख नियुक्त करून पक्ष बांधणी मजबूत करणार आहे तरी कार्यकर्त्यांनी तात्काळ कामाला लागावे. असे जाहीर आव्हान नागपूर मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या रासप कार्यकर्ता आढावा बैठकीत विदर्भ अध्यक्ष ऍड. रमेश पिसे यांनी केलें.

ही बैठक राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ संघटक हरिकिशन दादा हटवार यांचे अध्यक्षतेत विदर्भ जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठक आयोजीत केली होती. यावेळी नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष व रामटेक विधानसभा प्रमुख प्रशांत कडबे, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली तर भंडारा ज़िल्हा प्रभारी प्रेमकुमार मेसकर , गोंदिया जिल्हा प्रभारी राजन कुर्वे , शिक्षक आघाडीच्या विदर्भ अध्यक्षपदी शाम अणे यांची नियुक्ती केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे निवडीबाबत सर्व कार्यकर्त्यांनी हार्दीक स्वागत केलें.


यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ संपर्क प्रमुख तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी कृषी सम्राट राजेंद्र पाटील, विदर्भ अध्यक्ष तथा रामटेक लोकसभा प्रर्भारी प्रा. ऍड. रमेश पिसे, मुख्य महासचिव संजय कन्नावार, संघटक हरिकिशन दादा हटवार, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम कामडी, विधी आघाडी विदर्भ अध्यक्ष वसुदेव वासे, शिक्षक आघाडी विदर्भ अध्यक्ष शाम अणे, नागपूर शहर महिला आघाडी अध्यक्ष संध्या शेट्टे, नागपूर शहर सचिव देविदास आगरकर, नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद मडावी,ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कडबे,ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मेश्राम, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष शिवदास सोनावणे, भंडारा जिल्हा प्रभारी प्रेमकुमार मेसकर, गोंदिया जिल्हा प्रभारी राजन कुर्वे, उत्तम चव्हाण कास्ट्राईब कर्मचारी आघाडीचे अध्यक्ष अरुण गाडे, इंजि. सुषमाताई भड, संयुक्त मोर्च्याचे उपाध्यक्ष अनिलकुमार नागबुध्दा, सोनटके, वानखेडे, हुलके, आदी मान्यवर उपस्थित होते.