खाजगी वाहनांची अडगळीत पार्किंग - ओवरलोड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता



गोंडपिपरी -  तालुका प्रतिनिधी

शहरातून जाणारा बामणी- गोंडपिपरी -आष्टी या आंतरराज्य महामार्गाची निर्मिती झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शहरवासीयांना भेडसावणाऱ्या वाहतुकीची कोंडी या समस्येचे निराकरण होणार असे वाटत असतानाच शहरात वाहतूक पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे खाजगी वाहनांची अडगळीत पार्किंग व ओवरलोड वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अपघाताची दाट शक्यता वर्तविली जात आहे.


स्थानिक शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना बस स्थानक परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होताना निदर्शनास येते. सदर समस्या ही गेल्या वर्षानुवर्षांपासून रेंगाळत होती. मात्र नव्याने निर्माण करण्यात आलेल्या आंतरराज्य बामणी गोंडपिपरी आष्टी हाच चौपदरीकरण मार्ग असून सदर मार्गाचे काम पूर्णत्वास येताच अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या वाहतूक समस्येचे निराकरण होणार असे येथील सर्वसामान्यांना वाटत होती. मात्र स्थानिक जुना बस स्थानक परिसरात बाजारपेठेतील अनेक प्रतिष्ठान समोर तसेच मुख्य महामार्गावर अधिकृत वाहनतळ नसतानाही आणि खाजगी वाहन रस्त्यावर उभी केलं जात असल्याचे चित्र निदर्शनास येते. अशातच शहरातून जाणाऱ्या ओवरलोड रेतीची  वाहने, तसेच गणित साहित्य वाहून येणारी सुरजागड प्रकल्पाची शेकडो वाहने, व इतर जड वाहने अशा भरपूर प्रमाणात वाहनांच्या वर्दळीमुळे शहरातील सदर प्रमुख मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या परिसरात स्थानिक पोलिस स्टेशन अंतर्गत वाहतूक पोलीस नियुक्त केले असले तरी वाहतूक नियंत्रक पोलीस गणेश पोदाडी हे कर्तव्यावर न राहता केवळ वसुलीसाठी शहराबाहेरील जंगल परिसरात वाहने थांबून वाहन धारकांची  आर्थिक पिळवणूक करत दिलेली जबाबदारीपासून झटकत असल्याचा आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे. अशातच महामार्ग निर्मितीनंतर शहरातील मार्गाचे चौपदरीकरण झाले असतानाही सदर मार्गावर अनेक मोठे अपघात घडले आहेत. याच मार्गावरून विद्यार्थी तथा ग्रामीण आबालवृद्ध मार्गक्रमण करीत असून शहरातून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर वाहतूक नियंत्रक पोलिस गणेश पोदाडी यांचे खाजगी वाहन धारकांची असलेले सलोख्याचे व साटेलोटे याचे संबंध यामुळे खाजगी वाहनधारकांवर कारवाई करण्याऐवजी किरकोळ दुचाकी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारून केवळ कर्तव्य दक्षता चा टेंभा मिरवणा-या इतपत मजल मारून शहरातील नागरिकांच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने गोंडपिपरी ठाणे दारांनी गणेश पोदाडी या वाहतूक नियंत्रक पोलिसाची तात्काळ उचलबांगडी करून नवीन वाहतूक नियंत्रण प्रमुखाची नेमणूक करावी अशी मागणी जोर धरत आहे.


शहरात वाहतुकीची समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. मात्र राज्य मार्ग निर्मितीनंतर ही समस्या संपणार असे वाटत असताना खाजगी वाहन धारकांची वाढती मनोपली व शहरातून होणारी प्रचंड ओव्हरलोड वाहतूक यावर वाहतूक पोलिसाचे अंकुश नसून शहरातून होणाऱ्या वाहतुकीवर त्वरित निर्माण झाला धारकास मोठे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुनील संकुलवार 
नगरसेवक नगरपंचायत गोंडपिंपरी