अखेर एक नरभक्षक वाघ पिंजऱ्यात अडकला



चंद्रपूर वीज निर्मिती केंद्र ऊर्जानगर वसाहतीतील नविन टाईप गाळा येथे चंद्रपूर वीज केंद्र आणि वनविभागाच्या विशेष पथकाच्या संयुक्त मोहिमेला यश आले असून आज सोमवारला रात्री 9.15 च्या सुमारास एका वाघाला जेरबंद करण्यात आले आहे.
मागील काही वर्षांपासून सीएसटीपीएस परिसरात वाघांचा वावर वाढला आहे.अश्यातच एका 55 वर्षीय मजुराला ठार केले होते तर दुर्गापूर नेरी परीसरात बिबट्याने एका 16 वर्षीय युवकाला उचलून नेले होते.लगातर झालेल्या घटनेमुळे सर्वत्र दहशत पसरली.प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेऊन सर्व लोकप्रतिनिधींनी या वाघांचा बंदोबस्त करा,अशी मागणी लावून धरली.यात ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत,राज्यमंत्री तनपुरे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकरलोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांचा प्रामुख्याने समावेश आहे.वाघाला जेरबंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर हे उपोषणासाठी बसले आहेत.
सूत्रा कडून मिळालेल्या माहीती नुसार सर्व वाघ जेरबंद करून सिएसटीपीएस परिसर आता “नो टायगर झोन” केला जाणार आहे.त्या पार्श्वभूमीवर विजकेंद्र विशेष पथक व वनविभाग संयुक्त मोहीम राबवीत असून,8 पैकी पहिला वाघ जेरबंद झाल्याने,नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.