चंद्रपुरातील दारुबंदी ना.वडेट्टीवारांच्या स्वकीयांसाठी ,,,पडळकरांचे आरोप




स्वकीयांसाठी आधी छत्तीसगडमध्ये दारूची फॅक्टरी विकत घेतली आणि नंतरच कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण त्यांनी चंद्रपूरमधून दारूबंदी उठवली, असा आणि यासह अनेक धक्कादायक आरोप भाजपाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी एका पत्रातून ना. विजय वडेट्टीवार यांच्यावर केले आहेत.




आमदार पडळकर यांनी, ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली मंत्रिमंडळ उपसमिती वर्षभरापासून कागदावर असून ही उपसमिती शोधण्यासाठी स्पेशल टास्कफोर्सची नियुक्ती करावी अशी मागणी नुकतीच एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, आ. पडळकर यांच्यावर विखारी टीका केली होती.


त्यांच्या टीकेला पत्राद्वारे उत्तर देत आमदार पडळकर यांनी थेट ना. विजय वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप केले. टीकेला उत्तर देत मंत्री वडेट्टीवार यांना लिहिलेल्या पत्रात आमदार पडळकर यांनी, निष्क्रिय दिग्गजांच्या मंत्रिमंडळ उपसमितीतून एका मंत्र्याला जाग आली आहे असे सांगत दहावी पास असताना उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे कारण देत खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट प्राप्त केला, कंत्राटदारांसोबत टक्केवारीची तडजोड न झाल्याने तक्रारी केल्या. स्वकीयांसाठी छत्तीसगडमध्ये दारूची फॅक्टरी विकत घेऊन चंद्रपूरमधील दारूबंदी उठवली. २३ लिकर शॉप्सला भागीदारीने चंद्रपुरात स्थलांतरित केले. नागपुरात डीलरशिप घेऊन चंद्रपूरमधील विक्रेत्यांना दारू विकत घेण्याची अट घातली, असे प्रकार मी केले नसते, असा पत्रातून उल्लेख करीत ना. विजय वडेट्टीवार यांना चक्क उघडे केले आहे. आ. पडळकर यांचे हे पत्र राज्यात सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे.