▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

"त्या" लोकप्रतिनिधीची मध्यस्थी चर्चेचा विषय !



चंद्रपूर (वि.प्रति.)
त्या" लोकप्रतिनिधीची मध्यस्थी संशयास्पद !
सोमवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी वनविभागाच्या संबंधित कार्यालयामध्ये या प्रकरणातील मुख्य तस्कर, तपास अधिकारी वनरक्षक पठाण हे स्वतः घेऊन गेले गेले होते. त्या ठिकाणी एका लोकप्रतिनिधीची मध्यस्थी हा चर्चेचा विषय आहे. योगायोगाने त्या दिवशी कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या या लोकप्रतिनिधीची व तस्करांची भेट होऊ शकली नाही. लोकप्रतिनिधींनी वन्यप्राण्यांच्या तस्करीवर गंभीर रहायला हवे तर वन कर्मचाऱ्यांनी तस्करांसोबत हितसंबंध जोपासणे म्हणजे रक्षकच कुंपण खाण्यासारखे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व तस्करांना पाठीशी घालणाऱ्या वनरक्षक पठाण यांचेवर कायदेशिर या कारवाई करायला हवी.
चंद्रपूर शहरातील स्थानिक बंगाली कॅम्प परिसरात शनिवार दिनांक सात ऑगस्ट रोजी "हरिनाच्या मासाची विक्री होत आहे." या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने बंगाली कॅम्प परिसरात नावाने "नाग" असलेल्या एका इसमाच्या घरी धाड टाकली. या धाडीत काय निष्पन्न झाले याची माहिती घेण्यासाठी रविवार ला पत्रकारांनी वनरक्षक पठाण यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता "आम्हाला माहिती चुकीची मिळाली होती त्यात काहीच आढळले नाही मी माझ्या माणसांना त्याठिकाणी पाठवले होते." अशी माहिती पत्रकारांना दिली. यासंदर्भात चौकशी अंती वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रताप पठान हे घटनास्थळी वन विभागाची चमू घेऊन गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणाहून विक्री होणारे मास जप्त केल्याची ची माहिती मिळाली. मग वनरक्षक पठाण यांनी पत्रकारांसोबत ही बाब कां बरे लपवून ठेवली हा संशोधनाचा विषय आहे. यासंदर्भात सोमवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता शनिवारच्या धाडीमध्ये काही मास जप्त करण्यात आले. असून ते विक्री होणारे मास तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत प्रयोगशाळेच्या रिपोर्ट आल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार वनरक्षक पठाण यांनी मुख्य तस्कराला पाठीशी घालण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण च्या माध्यमातून हे प्रकरण संपूर्ण दडपण्याचा प्रयत्न केला होता काही पत्रकारांच्या जागरूकतेमुळे सदर प्रकरण त्यांना दडपता आले नाही. आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व मुख्य आरोपीला अटक करून तसेच या प्रकरणातील तपास अधिकारी वनरक्षक पठाण यांचीही चौकशी करावी करण्यात यावी व सदर "रॅकेट"चा पर्दाफाश व्हावा अशी मागणी पत्रकार संघातर्फे वन विभागाच्या प्रधान सचिव यांना करण्यात आली आहे.