चंद्रपूरातील "मयूर एजन्सी" कडून ग्राहकाची फसवणूक.



गडचांदूर प्रतिनिधी:-गडचांदूर येथील नगरपरिषद नगरसेवक प्रतिष्ठित व्यक्ती अरविंद डोहे यांचा मुलगा वैभव अरविंद डोहे यांनी ११ आगस्ट २०२१ रोजी चंद्रपूर येथील नामवंत प्रतिष्ठान "मे.मयुर एजन्सी" कडून पॅनासोनिक कंपनीची ५८ इंच टिव्ही किंमत ४९ हजार रुपयात खरेदि केली.दुकानातील प्रतीक नामक सेल्समॅन यांनी डेमो देताना स्मार्ट टिव्ही आहे यामध्ये बरेच फंक्शन असल्याचे सांगीतले.त्याच्यावर विश्वास ठेवून वैभव यांनी टिव्ही खरेदी केली.दुसऱ्या दिवशी सदर कंपनीचा टेक्निशियन वैभवच्या घरी गडचांदूर येथे आला असता "सदरची टिव्ही ही स्मार्ट नसून साधी असल्याचे सांगीतले" तेव्हा डोहेंना धक्काच बसला.सदर दिलेली टिव्ही फार जूनी असून टिव्ही manufacturing ची पट्टी काढलेली होती.त्यांनी दिलेल्या बिलावर टिव्ही साधी,स्मार्ट की एंड्राईड असे काहीही नमुद केलेले नाही.आणि टिव्हीचा सिरीयल नं.सुध्दा टाकण्यात आलेला नाही.


तेव्हा मे.मयुर एजन्सीच्या दुकान मालकाला अरविंद डोहे यांनी फोन करून विचारना केली.तेव्हा सुध्दा ते खोटे बोलत होते.ही स्मार्ट टिव्ही आहे,मी तुम्हच्या मुलाला सांगूनच दिले आहे. तेव्हा अरविंद डोहे यांनी विनंती केली की ही टिव्ही परत घ्या व मला दुसरी टिव्ही द्या,वरील रक्कम मी देण्यास तयार आहो अशी विनंती केली.परंतू ते काहीही ऐकायला तयार नव्हते.टिव्ही परत घेणार नाही या भुमीकेवर ते ठाम असल्याने अखेर अरविंद डोहे यांनी स्वतः किरायाने गाडी करून सदर टिव्ही त्यांच्या दुकानात नेऊन ठेवले.तेव्हा पण दुकानदाराने टिव्ही उचला विकलेला माल परत होत नाही.असे म्हणताच दोघांत चांगलाच वाद झाला व अरविंद डोहे यांनी आपली भुमीका ठाम ठेवून टिव्ही बदलवून घेतल्या शिवाय परत जाणार नाही.अशी भूमिका घेतल्याने दुकानदाराचे धाबे दणाणले व ती टिव्ही परत घेवून दुसरी दिली.यासर्व घडामोडी मुळे डोहे यांना मोठ्याप्रमाणात आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागला.सदर दुकानदारांनी अशाप्रकारे कित्येक ग्राहकांची फसवणूक केली असेल! हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.