▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

ती नियमबाह्य विषेश सभा रद्द करा...नगरसेवक डोहे यांची मागणी.




गडचांदूर -- नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी आज दुपारी १,३० वाजता "विशेष सभा " आयोजित केली. विषयसुची मधील कामकाज चालवण्यासाठी सदर सभा बोलाविण्यात आली असून यासंबंधीची नोटिस सर्व नगरसेवकांना देण्यात आले.यात एकुण पाच विषय ठेवण्यात आले.मात्र सदरची सभा नियमबाह्य असल्याचे म्हणत विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी सभा रद्द करण्यात यावी अशी विनंती मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.


नगराध्यक्षांनी विषेश सभा बोलावली खरी परंतु महाराष्ट्र नगर पालीका नगर पंचायत औधौगीक नगरी अधिनियम १९६५ कलम ८१ (२) नुसार हे विषेश सभा ही नगरपरिषदेच्या एक चतुर्थाशाहुन कमी नाही इतक्या परीषद सदस्यांनी लेखी विनंती सादर केली असता अधक्षांना लावता येते.परंतु सदरची सभा लावण्यासाठी कोणत्याही नगरपरिषद सदस्यांनी मा. नगराधक्षांना विनंती अर्ज केलेला नाही.असे असताना नगराध्यक्ष महोदयांना कुठलाही अधिकार नसताना सदरची सभा स्वतःच्या अधिकाराने लावलेली ती नियमबाह्य,बेकायदेशीर आहे.असे नगरसेवक डोहे यांनी निवेदनात नमूद करून सदरची सभा रद्द करण्याची मागणी केली आहे.या पुर्वी सुध्दा सर्वसाधारण सभेची नोटिस नियमा प्रमाणे सात दिवसा पुर्वी काढायचा असताना त्यावेळेस सुध्दा नगराधक्षांनी पाच दिवसातच सभा आयोजित केली.तेव्हा सुध्दा डोहे नगरसेवकांनी सभा नियमबाह्य असल्याचे मुख्याधिकारी यांना पत्र दिले आणी मुख्याधिकारी यांनी त्यांच्या पत्राची दखल घेत सदरची सभा रद्द करण्यात आली.व आता परत तिच चुकी नगराधक्षा कडुन घडली असल्याने‌ परत आज होणारी सभा रद्द करा असे निवेदन भाजपाचे नगरसेवक डोहे यांनी केले खरे पण ही सभा नियमानुसार की नियमबाह्य हे चित्र आता आजच्या सभेत स्पष्ट होईल हे मात्र तेवढेच खरे.