जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजपचे घंटानाद आंदोलन !

चंद्रपूर : कधी वेतनवाढीसाठी आंदोलने होतात, विविध
मागण्‍यांसाठी आंदोलने होतात मात्र हे आंदोलन वैशिष्‍टयपूर्ण असून सर्वधर्मीयांचा सहभाग असलेले हे आंदोलन आहे. राज्‍यात दारूची दुकाने, मॉल्‍स सुरू करण्‍यात आली आहेत. त्‍याठिकाणी कोरोनाची भिती नाही. मग केवळ प्रार्थना स्‍थळांमध्‍ये कोरोनाची भिती सरकारला वाटत आहे. देशात केवळ महाराष्‍ट्रातच प्रार्थनास्‍थळे बंद आहेत. गेली सहा महिने मुख्‍यमंत्र्यांनी जे जे आवाहन केले ते आम्‍ही नियम पाळून मान्‍य केले, त्‍यावर अमल केला. मात्र आता नियम पाळून प्रार्थनास्‍थळे उघडा अशी मागणी आम्‍ही करीत आहोत. जहा दवा काम नहीं करती वहा दुआ काम करती है असे म्‍हणतात. अशावेळी नागरिकांना आपल्‍या श्रध्‍दास्‍थानासमोर भक्‍तीने लीन होण्‍यासाठी राज्‍यातील सर्व प्रार्थनास्‍थळे उघडण्‍यात यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
दिनांक 29 ऑगस्‍ट रोजी भाजपातर्फे चंद्रपूर शहरात आयोजित घंटानाद आंदोलनात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. भाजपातर्फे आज मंदीर, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा, बुध्‍दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळे उघडण्‍यात यावी या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्‍यात आले. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, राज्‍यात दारूची दुकाने, मास विक्री, मॉल्‍स, बसेस, व्‍यापार सर्व सुरू असताना केवळ प्रार्थनास्‍थळे बंद असणे ही बाब निश्‍चीतच सर्वधर्मीय नागरिकांना न रूचणारी आहे. माहिती व जनसंपर्क विभागाला सांगून सर्व प्रार्थनास्‍थळांसमोर सावधानीचे उपाय सांगणारी नियमावली शासनाने प्रसिध्‍द करावी व सर्वधर्मीयांना त्‍यांच्‍या आराध्‍यांचे दर्शन घ्‍यायची मुभा द्यावी. देशात सर्वदूर प्रार्थनास्‍थळे उघडी असताना महाराष्‍ट्रातच प्रार्थनास्‍थळे बंद का हा प्रश्‍न अनाकलनीय आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. मुस्‍लीम, ख्रिश्‍चन, शिख, बुध्‍द व हिंदू धर्माच्‍या सर्व प्रमुखांचे आंदोलनात सहभागी झाल्‍याबद्दल त्‍यांनी आभार व्‍यक्‍त केले. यावेळी दार उघड उध्‍दवा, दार उघड असे नारे देत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी घंटानाद केला. यावेळी सर्व धर्माच्‍या प्रमुखांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करत राज्‍य सरकारवर जोरदार टिका केली.
यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, भाजपा नेते राजेंद्र गांधी, उपमहापौर राहूल पावडे, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, भाजपा नेते प्रकाश धारणे, मनपा सदस्‍य सुभाष कासनगोट्टूवार, माजी उपमहापौर अनिल फुलझेले आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी शिख धर्माचे चरणजीतसिंग वाधवा, चमकोरसिंग बसरा, बलबीरसिंग गुरम, रविंद्रसिंग भाटीया, हिंदू धर्माचे मनिष महाराज, विजय चिताडे, ख्रिश्‍चन धर्माचे फादर सुनिल कुमार, फादर घाटे, फादर अमीन कलवल, पास्‍टर प्रकाश भगत, पास्‍टर सुमेन जेनेकर, विजय नळे, मुस्‍लीम धर्माचे मुश्‍ताक खान, बौध्‍द धर्माचे भंते कृपाशंकर महाथेरो, करूणा बोधी, धम्‍मप्रकाश, जैन धर्माचे महेंद्र मंडलेचा, अमर गांधी, प्रकाश गोठी, गायत्री परिवाराचे डॉ. शैलेंद्र शुक्‍ला, अरविंद तिवारी, मनोज मालवी, श्री. वडपल्‍लीवार, दिपक चोप्रा आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी सर्व धर्मीय प्रमुखांनी आपआपल्‍या धर्मांची प्रार्थना सुध्‍दा केली.
कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले. आभार डॉ. मंगेश गुलवाडे यांनी व्‍यक्‍त केले. यावेळी सोशल डिस्‍टन्‍सींग पाळत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने मागणीचे निवेदन जिल्‍हाधिकारी यांना सादर केले.

गडचांदूरात ही भाजपाचे घंटानाद आंदोलन !


गडचांदूर : आज गडचांदूर शहरात भारतीय जनता पार्टी गडचांदूर तर्फे महाआघाडी सरकार च्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने दिनांक ४ जूनला देश्यात सर्व धार्मिक स्थळ भक्ताकरिता नियम अटी नुसार खुले करण्याचे परिपत्रक जाहीर केले व काही राज्यामध्ये बहुतांश सर्वच धार्मिक स्थळ मंदिर, मज्जीद, चर्च,गुरुद्वारा,बोधविहार ,व जैन मंदिरे खुले करम्यात आले आहे परन्तु आपल्या राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने यावर कुठलाही विचार विनियम अजूनही केलेला नाही. अनेकदा भक्तांकरिता धार्मिक स्थळ खुले करण्याकरिता धार्मिक संघटनेने शासनांकडे मागणी केली आहे. सरकारचे लक्ष वेधण्याकरीता प्रदेश भाजपा व जिल्हा भाजपाच्या सुचने नुसार आज गडचांदूर येथे प्रभाग क्र २ यशवन्त नगर ,बस स्टॉप ,गांधी चौक,दुर्गा माता मंदिर अचानक चौकात भारतीय जनता पार्टिकडून घंटानाद आंदोलन केले आहे.व मा. मुख्यमंत्री याना ईमेल द्वारे निवेदन पाठवून भावना व्यक्त केल्या आहे.जनतेचया भावनेचा आदर करून अटी,नियमासह सर्व धार्मिक स्थळ खुले करावे अशी मागणी केली आहे. या वेळी भाजपाचे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचिवार, निलेशजी ताजने, नगरसेवक अरविंद डोहे , रामसेवक मोरे , हरीश घोरे , हरिभाऊ मोरे,मधूकरजी कोवळे,संदीप शेरकि,शिवसजी शेलोकर,कृष्णा भागवत,गजानन शिंगरू,गोपाल मालपाणी,राकेश अरोरा,सत्यदेव शर्मा, अरविंद कोरे,शेख महेबूब भाई, अशोक दरेकर,परशुराम मुसळे,बबलू रासेकर,योगेंद्र केवट,संदीप निसाद, रोहन काकडे,सचिन गुरनुले,वैभव पोटे,तुषार देवकर,गणपत बुरटकर, प्रकाश काटिसकर,माजी नगराध्यक्ष सौ विजयालक्ष्मी डोहे,,सौ रंजना मडावी,ऍड दिपनजकी मंथनवार,सौ राजश्री आसुटकर,सौ प्रतिभा जोगी,सौ अल्का पारखी,सौ चित्रांजली बतखल,सौ मंजूषा कटिस्कर,सौ मंदाताई खामनकर,सौ मनजित कौर हजरा ,सौ सोनू देरकर सहित सर्व पदाधिकारी उपस्थित होते.