▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

चंद्रपूर जिल्हयातील आतापर्यंतची बाधित संख्या १०२



चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या दोन जुलै रोजी रात्री उशिरा १०२ वर पोहोचली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने रात्री उशीरा दिलेल्या माहितीनुसार चारही बाधित गृह व संस्थात्मक अलगीकरणातील आहे.
चार नव्या बाधितामध्ये वरोरा येथील कासम पंजा वार्डमधील संपर्कातील ३४ वर्षीय व्यक्तीचा सहभाग आहे. तर चंद्रपूर शहरातील ऊर्जानगर भागातील नवी दिल्ली येथून आलेला ३३ वर्षीय पुरुष, तुकुम भागातील सिकंदराबाद येथून आलेल्या २१ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ऊर्जानगर व तुकूम परिसरातील दोन्ही बाधित संस्थात्मक अलगीकरणात होते. तर चौथा बाधित गडचांदूर येथील एसीसी कॉलनीतील रहिवासी आहे. हा २४ वर्षीय व्यक्ती दिल्लीवरून कोरपना तालुक्यातीत गडचांदूर अवालपूर येथे आल्यानंतर गृह अलगीकरणात होता. काल १ जुलैला चारही नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चारही बाधितांची प्रकृती स्थिर आहे
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) आणि २ जुलै ( २ बाधित )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १०२ झाले आहेत. आतापर्यत ५६ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १०२  पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ४६ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.